येवला बस आगारात वाहतूक सुरक्षितता सप्ताहाचे उद्घाटन

येवला - येवला बस आगारात वाहतूक सुरक्षितता सप्ताहाचे उद्घाटन शहर
पो.निरिक्षक श्रावण सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी
आगार प्रमुख भगवान जगणोर होते. एस.टी महामंडळातर्फे दि.३ ते १७ जानेवारी
पर्यंत चालणाऱ्या या सप्ताहात चालकांनी आपले वाहन सुरक्षिकपणे
चालविण्याबाबत तसेच वाहकांनी प्रत्येक थांब्यावर प्रवासी घेणे व त्यांना
चांगली सेवा देण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच वेगमर्यादा ,दोन वाहनांतील
सुरक्षित अंतर, ओव्हरटेकींगची पध्दत तसेच प्रवाशांना अपघाताबाबत शंका व
त्यांच्यातील अविश्वास दुर करणे . एस.टी बस हाच सुरक्षीत प्रवासासाठी
एकमेव पर्याय असल्याची जाणिव करुन देणे याबाबत पो.नि श्रावण सोनवणे यांनी
सखोल मार्गदर्शन केले. तस प्रवाशांशी सौजन्याने व सलोखा कायम ठेवून एस.टी
बद्दल विश्वास निर्माण करावा तसेच या कालावधी पुरताच सुरक्षीतता
मर्यादित न ठेवता कायम स्वरुपी सुरक्षीतता अंगीकारावी असे आवाहन
आगारप्रमुख भगवान जगणोर यांनी केले. पो.नि . श्रावण सोनवणे यांचा सत्कार
आगारप्रमुखांनी केला. प्रास्ताविक अप्पा जाधव यांनी तर सुत्रसंचालन
ए.ए.शेख यांनी केले. कार्यक्रमास एसटी बस आगारातील चालक वाहक बहुसंख्येने
उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने