येवला तालुक्यातील चिंचोडी येथे रविवारी ग्रंथालय संघाचे अधिवेशन

येवला - नाशिक विभागीय ग्रंथालय संघाचे 15वे आणि जिल्हा ग्रंथालय संघाचे
43वे अधिवेशन रविवारी (दि. 16) तालुक्यातील चिचोंडी येथे होणार आहे.
सकाळी 9 ते 5 या वेळेत येथील गुरुजी सार्वजनिक वाचनालयात याचे आयोजन केले
आहे. उद्घाटन औरंगाबादचे प्रसिद्ध कवी तथा जनशांती वाचक चळवळीचे प्रणेते
श्रीकांत उमरीकर यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
कवी खलील मोमिन असतील. या वेळी विशेष अतिथी म्हणून पालकमंत्री छगन भुजबळ,
आमदार पंकज भुजबळ आदी उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमासाठी
ग्रंथप्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन स्वागताध्यक्ष प्रमोद पाटील
यांनी केले आहे.
थोडे नवीन जरा जुने