येवला शहरात विश्वकर्मा जयंती साजरी

येवला (अविनाश पाटील) शहरातील बाजीरावनगर येथे श्री विश्वकर्मा जयंती
कार्यक्रम उत्साहात पार पडला. बांधकाम व सुतार व्यावसायिक रमेश मोरे
यांनी प्रतिमापूजन केले. बांधकाम क्षेत्राशी निगडीत सर्व कारागीरांचा देव
मानल्या जाणाऱ्या विश्वकर्मा जयंती गेले कित्येक वर्षांपासून येवल्यात
साजरी केली जात आहे. भगवान विश्वकर्मा देवांचे वास्तुकला तज्ञ आहेत.
त्यांनी भगवान श्रीकृष्णासाठी द्वारका,पांडवासाठी हस्तिनापूर व रावणासाठी
सोन्याची लंका तयार केली. या नगरांच्या रचनेत, सौंदर्य, अचुकता व सुखसोयी
यांचा मिलाप होता.ते वास्तुशास्त्राचे पहिले प्रणेते आहेत.भगवान
विश्वकर्मा यांनी लंकेत प्रवेश करण्यासाठी श्रीरामाला सहकार्य केले होते.
त्यांच्या मार्गदर्शनाखालीच महाबली हनुमान, नल−निल या सारख्या
वानरसेनेतील स्थापत्य तज्ञांनी रामसेतू बांधला.भगवान विश्वकर्मा यांनी १४
ब्रम्हांडाची रचना केली. त्यात वायुमंडळ, कैलास,वैकुंठ, ब्रम्हपुरी,
इंद्रपुरी,स्वर्ग, पृथ्वी, पाताळातील नागलोक इत्यांदिंची रचना केली होती.
त्यांनी 'विश्वकर्मा वास्तुशास्त्र' या ग्रंथाची रचना केली.ब्रह्माच्या
इच्छेनुसार त्यांनी नित्य नवीन औजारे शोधलीत.त्यांना सौर उर्जा
वापरण्याचे व त्या उर्जेच्या नियंत्रणाचे ज्ञान प्राप्त होते. सूर्याचे
या शक्तिचा वापर करून त्यांनी विष्णु शिव व इंद्रासाठी क्रमाने सुदर्शन
चक्र, त्रिशूळ व विजय रथ निर्माण केला.ते हरहुन्नरी होते.अन्य विविध
शास्त्रांच्या निर्माणात, त्याचे नियम ठरविण्यात,व त्या त्या
शास्त्रांच्या विकासास त्यांनी हातभार लावला.शस्त्रे व अस्त्रे, अलंकार,
विमान आदिंचेही त्यांनी निर्माण केले.सुमारे १२००च्या जवळपास
यंत्र-तंत्र,शस्त्रास्त्रे व साधनांच्या त्यांनी निर्मिती
केली.पांडवांसाठी मयसभा बनविणारा मयासूर त्यांचा शिष्यच होता. आजही
सोनार,लोहार,सुतार,कुंभार,कासार इत्यादी समाज त्यांना आपले दैवत मानतात.

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने