मतदार माहिती चिठ्ठीचे वेळेत वाटप करावे - बाबासाहेब गाढवे

मतदार माहिती चिठ्ठीचे वेळेत वाटप करावे - बाबासाहेब गाढवे

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने येवला मतदारसंघातील मतदारांच्या सोयीसाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार तयार करण्यात आलेल्या मतदार माहिती चिठ्ठीचे(वोटर इन्फॉर्मेशन स्लीप)विहित वेळेत मतदारांपर्यंत वाटप करण्यात यावे ,असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब गाढवे यांनी दिले.
 केंद्रस्तरीय मतदान अधिकारी व पर्यवेक्षक यांची बैठक निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब गाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालय, येवला येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी वोटर इन्फॉर्मेशन स्लीप अर्थात मतदार माहिती चिट्ठी मतदारांपर्यंत दिनांक 14 नोव्हेंबर 2024 अखेर पोहोचणे गरजेचे आहे. कोणताही नोंदणीकृत मतदार या चिठ्ठीपासून वंचित राहणार नाही, याची काळजी संबंधित केंद्रस्तरीय मतदान अधिकारी व पर्यवेक्षक यांनी घ्यावी, मतदार माहिती चिठ्ठीचे वाटप करताना घरातील प्रौढ व्यक्तींकडेच ही चिठ्ठी देण्यात यावी , चिठ्ठी मतदाराला मिळाल्याबाबतची पोहोच संबंधित रजिस्टरमध्ये घेण्यात यावी, अशा सूचना श्री गाढवे यांनी दिल्या.

काय आहे मतदार माहिती चिठ्ठी?

मतदारांना मतदानाचा दिनांक, मतदानाची वेळ, मतदानाचे ठिकाण, मतदान केंद्र क्रमांक, मतदान केंद्राचा नकाशा, यादी भाग क्रमांक व मतदार यादीत अनुक्रमांक ही माहिती या चिठ्ठीद्वारे मिळते. तसेच मतदारांना निवडणूक आयोगाने निर्देशित केलेल्या सूचनांची माहिती मिळते.
असे असले तरी मतदार माहिती चिठ्ठी हा मतदानासाठीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येत नाही यासाठी निवडणूक आयोगाने निर्धारित केलेले ओळखपत्र किंवा ओळखीचे पुरावे दाखवूनच मतदान करता येते.

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने