राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या वतीने परभणी येथील संविधान विटंबना प्रकरणी तहसीलदारांना निवेदन

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या वतीने परभणी येथील संविधान विटंबना प्रकरणी तहसीलदारांना निवेदन

 येवला : पुढारी वृत्तसेवा
परभणी शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोरील संविधानाच्या प्रतिची एका देशद्रोही, समाजकंटक व जातीयवादी विचारसरणीच्या माथेफिरूने विटंबना केल्याच्या विकृत कृत्याचा येवला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या वतीने तिव्र निषेध व्यक्त करण्यात आला व तहसीलदार आबा महाजन यांना या बाबतचे निवेदन देण्यात आले आहे.यावेळी अशा भ्याड व जातीयवादी कृत्याबद्दल सरकारने कडक कारवाई करणे गरजेचे असुन, राज्यातील कायदा व सुव्यवस्था किती ढासळली आहे हे दिसून येत आहे. भारतीय संविधान या देशातील प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्यायाची शिकवण देते, व प्रत्येकाच्या संरक्षणाची हमी संविधान देत असतांना संविधानाच्या प्रतिची शिवराय  शाहु, फुले, आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात अशी विटंबना होत असेल तर तो अत्यंत निंदनीय प्रकार आहे.याचा निषेध करावा तेवढा थोडा असल्याची भावना निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. तसेच आरोपींना देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक करून शिक्षा देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी दिपक लाठे, संदिप खळे,सागर पडवळ, बाळासाहेब कसबे, नितीन संसारे,तेजेस शिंदे, समाधान पडवळ,सागर हिरे, गौतम चव्हाण, रणजित संसारे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने