येवला शहर काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर


येवला - (अविनाश पाटील)
शहर काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, त्यात कार्याध्यक्षपदी फारूक चमडेवाले यांची निवड करण्यात आली आहे
काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय कासार, तालुकाध्यक्ष अरुण आहेर यांनी शहर कार्यकारिणी घोषित केली. त्यात उपाध्यक्षपदी बाळासाहेब मांजरे, शकील शेख, संजय शिंदे, सरचिटणीसपदी ज्ञानेश्वर दोडे, नानासाहेब शिंदे, प्रीतम पटणी, कुदटुस अन्सारी, खजिनदार म्हणून मुकेश पाटोदकर, संघटकपदी अनिल गोसावी यांची, तर सदस्यपदी निशिकांत पटणी, दिलीप आचारी, पिंटू माळेकर, कपिल खेरूड, मॉन्टी मथुरे, सय्यद अझर, सुरेश गोंधळी, सुरेश कासार, विठ्ठल नागपुरे, बाळू मढवई यांची व सल्लागारपदी तात्या लहरे, सुरेश गोंधरी, सुरेश पटणी, मुकुंद पोकळे, भालचंद्र कुक्कर, अमित पटणी, दिलीप तक्ते, राजेश भंडारी यांची निवड करण्यात आली आहे. शहराध्यक्ष संजय कासार, ज्येष्ठ नेते बाळासाहेब मांजरे आदींच्या उपस्थितीत कार्यकारिणी घोषित करण्यात आली. या वेळी आयोजित पत्रकार परिषेदत तालुकाध्यक्ष अरुण आहेर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर आघाडी धर्म पाळत नसल्याचा आरोप केला. येवला-लासलगाव विधानसभेची जागा कॉंग्रेस पक्षाला द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. 
थोडे नवीन जरा जुने