भरपाई देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न पालकमंत्री छगन भुजबळ यांचे आश्वासन

येवला - अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे.
शासनाच्या वतीने शेतकर्‍यांना योग्य ती नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी
निवडणूक आयोगाच्या सहमतीनंतर सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असे आश्वासन
पालकमंत्री छगन भुजबळ यांनी रेंडाळे येथील नवनाथ आहेर यांच्या डाळिंब
बागेची, पांजरवाडी येथील आगवन वस्तीवरील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी
केल्यानंतर दिले.
येवला तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाचा दौरा नामदार छगन भुजबळ यांनी
केला. त्यांच्यासमवेत आमदार पंकज भुजबळ, प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल,
नाशिक शहराध्यक्ष शरद कोशिरे आदी या दौर्‍यात सहभागी झाले होते.
दौर्‍यादरम्यान गारखेडा येथील आप्पासाहेब खैरनार, अंगुलगाव येथील भागीनाथ
जगझाप, न्याहारखेडा येथील देवरे वस्ती यांच्या कांदा पिकांची भुजबळांनी
पाहणी केली. तसेच विंचूर येथील रत्नाकर दरेकर, सुनील जेऊघाले, बबन दरेकर,
मधुकर दरेकर, कैलास गोरे, शांताराम नागरे आदी द्राक्षउत्पादकांच्या
नुकसानीची पाहणी केली. या दौर्‍याप्रसंगी नगराध्यक्ष नीलेश पटेल, जिल्हा
परिषद सदस्य प्रवीण गायकवाड, कृष्णराव गुंड उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने