येवले तालुक्यात चार घरांवर दरोडे दरोडेखोरांकडुन सोन्याच्या दागिन्यासह ४ लाखाची लूट कोयते , कुऱ्हाड,तलवारीचा धाक दाखवून केली दहशत व मारहाण


येवला दि.२१ ( प्रतिनिधी) रविवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास
तालुक्यातील धामणगांव व अंदरसूल शिवारातील चार घरांवर दरोडे टाकत
दरोडेखोरांनी सोन्याच्या दागीन्यासह सुमारे ४ लाख रुपयांची लूट केली.
कोयते , कुऱ्हाड व तलवारींच्या धाक दाखवत दरोडेखोरांनी दहशत निर्माण करीत
काहींना मारहाण केली.
धामणगाव शिवारातील धामणगाव -सायगाव रस्त्यावर तुकाराम पर्वत वाळुंज
यांच्या वस्तीवर सर्वप्रथम १० ते १२ दरोडेखोरांनी दरोडा घातल २० ते २५
वयोगटातील व मराठी भाषेत बोलणाऱ्या या दरोडेखोरांनी कोयते,कुऱ्हाडी व
तलवारींचा धाक दाखवत तुकाराम वाळुंज यांच्या मुलगा दगू यास धमकावले .
यानंतर दरोडेखोरांनी आपला मोर्चा घरातील वाळुंज यांची पत्नी कुसुम
व सून सोनाली यांच्याकडे वळवला. दोघींच्या अंगावरील साडेअकरा तोळे
सोन्याचे दागीने दरोडेखोरांनी अक्षरक्षः ओरबाडले. २ लाख ४३ हजारांचे
दागीने चोरतांना वाळुंज यांच्या घरातील सुमारे ५० हजारांची रोकडही
दरोडेखोरांनी लांबवली. यानंतर दरोडेखोर धामणगाव व अंदरसूल या दोन्ही
शिवाराच्या सीमेवर असलेलल्या कैलास पांडुरंग धनगे यांच्या वस्तीवर गेले.
मराठी व तोडकी मोडकी हिंदी बोलणारे या दरोडेखोरांनी धनगे यांच्या
वस्तीवरही शस्रास्रे दाखवत घरातील व्यक्तीनांही धमकावले.धनगे यांच्या
घरातून दरोडेखोरांनी रोख रक्कम व सोन्याच्या दागीन्यांसह सुमारे ९७ हजार
५०० रुपयांचा ऐवज पसार केला. दरोडेखोरांनी यावेळी कैलास धनगे यांना
किरकोळ मारहाण केली.
दरोडेखोरांचा मोर्चा पवार- घोडेराव वस्तीकडे--

१० ते १२ संख्येने असल्या दरोडेखोरांनी वाळुंज व धनगे यांच्या वस्तीवर
लूट केल्यानंतर आपला मोर्चा नामदेव पवार यांच्या वस्तीवरील घराकडे वळवीला
. पवार यांच्या घरांतून रोख रक्कमेसह ५ हजारांचा ऐवज चोरला.
पवारवस्तीजवळचे अंदरसूल शिवारात चंद्रकांत घोडेराव यांच्या वस्तीवर
दरोडेखोरांना मात्र घोडेराव यांचा सामना करावा लागला.  चंद्रकांत घोडेराव
यांनी निडरपणाने एका दरोडेखोराला लाथेने मारले. दरोडेखोरांनाच मारणाऱ्या
घोडेरावांवर मात्र इतर दरोडेखोरांनी हल्ला केला. जवळ मोबाईल हॅन्डसेट
नसल्याने घोडेराव जवळच असलेल्या वस्तीवरील लोकांशी संपर्क करू शकले
नाहीत. मात्र त्याचवेळी दरोडेखोर पसार झाले.
पोलिसांचा संपर्क ----
वाळुंज व धनगे वस्तीवरील दरोड्यानंतर घटनेची माहिती पोलिस पाटलाने येवला
तालुका पोलिस ठाण्याला लगेचच कळवली . पोलिस निरिक्षक राम भालसिंग हे
अंदरसूल येथून शांतता कमिटीची बैठक आटोपून येवल्यात पोहचलेले असतानाच
त्यांना दरोड्याचा संदेश मिळाला. भालसिंग यांनी सोबतीला २० ते २५ पोलिस
कर्मचाऱ्यांना घेऊन धामणागाव गाठले. त्याठिकाणी सुमारे ५० ग्रामस्थांचा
समूह उभा होता. दरोडेखोर घोडेराव वस्तीवर असतानाच पोलिस धामणगावात पोलिस
पोहोचले होते. मात्र केवळ संपर्काअभावी दरोडेखोर रंगेहाथ पोलिसांच्या
तावडीतून सुटले. ग्रामस्थांसह पोलिसांनी संपुर्ण परिसर पिंजल्यानंतर ही
दरोडेखोर मात्र पोलिसांना सापडले नाहीत.

श्वान पथकाने दाखवला राज्य महामार्गापर्यंत माग........

पोलिस निरिक्षक राम भालसिंग यांनी घटनेची माहिती त्वरीत वरीष्ठ
अधिकाऱ्यांना दिल्यानंतर श्वानपथक, ठसे तज्ञ व क्राईम ब्रॅंचच्या पथकाला
घटनास्थळावर नाशिक येथून रात्री साडेबारा वाजता पाचारण करण्यात आले.
श्वान पथकाने वाळुंज यांच्या घरापासून नंतर धनगेवस्ती व यानंतर ऐरंगाबाद
राज्य महामार्गापर्यंतचा माग दाखवला.

अप्पर पोलिस अधिक्षक सुनिल कडासने व मनमाड पोलिस उपअधिक्षक नरेश
मेघराजानी यांनी रात्री १ वाजता घटनास्थळांवर भेट देत पाहणी केली. तसेच
दरोडेखोरांच्या शोधासाठी तपासाला सुरुवात केली. जिल्हा पोलिस अधिक्षक
संजय मोहिते यांनी आज सकाळी साडे दहा वाजता दरोडा पडलेल्या चारही घरांना
भेटी दिल्या. एकाच रात्री पडलेल्या चार दरोड्यांनी ग्रामीण भागात दहशतीचे
वातावरण निर्माण झाले असून तालुका पोलिसांपुढेही दरोडेखोरांच्या शोधांचे
संकट उभे राहीलेले आहे.


वस्त्यावर दरोडेखोर दरोडे टाकत असतांना परिसरातील ग्रामस्थांनी सहकार्य
करावयास हवे होते. दरोडेखोर या वस्तीवरून त्या वस्तीवर जात असताना संपर्क
साधायला हवा होता. मात्र ग्रामस्थांच्या असहकार्यामुळे दरोडेखोर पसार
होण्यात यशस्वी झाले. राम भालसिंग --- पोलिस निरिक्षक येवला ग्रामीण
थोडे नवीन जरा जुने