शिधापत्रिकेसाठी शिबीराचे आयोजन

शिधापत्रिकेतील नाव वाढविणे अथवा नाव कमी करणे, फाटलेल्या, जिर्ण झालेल्या
शिधापत्रिका बदलून दुय्यम शिधापत्रिका देणे या कामांसाठी सुवर्ण जयंती राजस्व
अभियानांतर्गत येवला तहसिल कार्यालयामार्फत तालुक्यात शिबीरांचे आयोजन करण्यात
आले आहे, अशी माहिती तहसिलदार शरद मंडलिक यांनी दिली.
येवला येथे दि. ३० जुलै, नगरसूल येथे दि. ३१ जुलै, अंदरसूल दि. ६ ऑगष्ट,
पाटोदा येथे दि. ८ ऑगष्ट, सावरगाव येथे दि. १२ ऑगष्ट व जळगाव नेऊर येथे दि. १३
ऑगष्ट रोजी शिबीर घेण्यात येणार असून या शिबीरांमध्ये  नाव वाढविणे, कमी करणे,
जिर्ण झालेली शिधापत्रिका बदलून घेण्यासाठी सध्याची शिधापत्रिका जमा करणे
आवश्यक आहे. शिधापत्रिका हारवलेली असल्यास दुय्यम शिधापत्रिका मिळणेसाठी रु.
१०० चे स्टँपर प्रतिपाज्ञापत्र करुन देणे आवश्यक आहे. तसेच नवीन शिधापत्रिका
मिळण्यासाठी आवश्यक सर्व कागदपत्रांची पुर्तता केलेली असल्यास त्यांचे
प्रस्ताव दाखल करुन घेतले जातील. शिबीरांचा जास्तीत जास्त कार्डधारकांनी लाभ
घ्यावा, असे आवाहन तहसिलदार मंडलिक यांनी केले.
थोडे नवीन जरा जुने