नगरसेवक सचिन शिंदे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन…

नगरसेवक सचिन शिंदे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन…
येवला – वार्ताहर
आता निवडणुकीचा हंगाम संपला तरी आता सर्व पक्षीय नगरसेवकांनी सहकार्याचे धोरण ठेवून विकासाच्या बाबतीत राजकारण मध्ये न आणता जनतेच्या अपेक्षांची पुर्तता करावी असे आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस एड. माणिकराव शिंदे यांनी केले. हुडको वसाहतीमध्ये प्रभाग क्र.८ चे राष्ट्रवादीचे नगरसेवक सचिन शिंदे यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन एड. माणिकराव शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मालेगावजवळील जवार्डी येथील दादामहाराज , नगराध्यक्ष बंडू क्षिरसागर, उपनगराध्यक्ष सुरज पटणी उपस्थित होते.
शहरामध्ये निवडणुकीनंतर जनतेला नगरसेवकांशी संपर्क साधण्यासाठी नगरसेवकाचे संपर्क कार्यालय गरजेचे आहे, निवडणुकीच्या काळात दररोज भेटणारे उमेदवार नगरसेवक झाल्यावर भेटत नाही. मात्र सचिन शिंदे यांनी संपर्क कार्यालय सुरु करुन प्रभागातील जनतेचा विश्वास सार्थ ठरवला असल्याचेही ते यावेळी म्हणाले. यावेळी नगराध्यक्षांना उद्देशून एड.शिंदे यांनी राज्यात व केंद्रात भाजपची सत्ता आहे. नगरपालिकेवरही सध्या भाजपचेच नगराध्यक्ष आहेत तरी येवला शहराची रखडलेली भुयारी गटार व रस्ते क्रॉक्रिंटीकरणाची योजना मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांकडे कॉग्रेस राष्ट्रवादीने दुर्लक्ष केल्याचे म्हणत शिवसेनेने छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकीय वापर केल्याचे मत एड.शिंदे यांनी मांडले. सध्या भाजप – शिवसेनेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नाव वापरावरून आरोप प्रत्यारोप चालू आहेत असे बोलत एड.शिंदे यांनी हा वाद न करता भाजपला शहर , राज्य, केंद्र तिन्ही ठिकाणी पाच वर्षांसाठी सत्ता आहे हे लक्षात घेऊन छ.शिवाजी महाराज हे कोण्या एका जाती धर्माचे नव्हे तर सर्वधर्मीय रयतेचे राजे होते, छत्रपतींचा तो आदर्श डोळ्यापुढे ठेवून सर्वसामान्यांसाठी कार्य करा असे आवाहन त्यांनी केले.
नगराध्यक्ष बंडू क्षिरसागर यांनी संपर्क कार्यालय उपक्रमाची स्तुती करीत जनतेने आपल्या सुचना नगरपालिकेला कळवण्याचे आवाहन केले. यावेळी जनकल्याण सेवा समितीचे नारायण शिंदे यांनी शहरातील रहदारीच्या प्रश्नावर तोडगा म्हणून विंचुर चौफुलीवर वाहतुक सिग्नल यंत्रणेसाठी पाठपुरावा करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमासाठी एड. बाबासाहेब देशमुख,बालू शिंदे, नगरसेवक डॉ.संकेत शिंदे, नगरसेवक गणेश शिंदे, नगरसेवक प्रविण बनकर,नगरसेवक दयानंद जावळे, एड. शाहु शिंदे, एड.मिलींद शिंदे संतोष परदेशी, मनिष काबरा, निस्सार लिंबुवाले, राजू कदम, प्रशांत शिंदे, अरविंद शिंदे, भास्करराव शिंदे, शुक्लेश्वर जाधव, शाम शिंदे, राम शिंदे, रवि शिंदे, तात्या त्रिभुवन, रामदास पाटील, भागीनाथ उशीर, आरिफ तांबोळी, सुमित शिंदे आदींसह रायगड ग्रुपचे कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संजय शिंदे यांनी केले.
थोडे नवीन जरा जुने