स्वामी मुक्तानंद हुडको स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

 स्वामी मुक्तानंद हुडको स्नेहसंमेलन उत्साहात साजरे
 

येवला : वार्ताहर
स्वामी मुक्तानंद प्राथमिक हुडको वसाहत शाळेत शनिवारी वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. या स्नेहसंमेलनात चिमुकल्यांनी आपल्या कलागुणांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. बहारदार नृत्यांनी आपल्या पालकांची व मान्यवरांची मने जिंकली. यावेळी दिपप्रज्वलनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला.मुलांनी एकापेक्षा एक सरस नृत्य सादर केली. कोळीगीते,डोंबारी गीत,बालगीते,फिल्मी गीते,शेतकरी गिते, भक्तीगीते तसेच गौवळणी सादर करत महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविले.
मुलांच्या नृत्याची तयारी शिक्षकासह पालकांनी करुन घेतली.प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांना शाळेत खुले व्यासपिठ मिळावे.अभ्यासासोबतच मुलांना आपल्यातील कलेला वाव मिळावी. लोकांचेही मनोरंजन व्हावे, या हेतुने कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे संस्था अध्यक्ष शरद नागडेकर,सेक्रेटरी डॉ अमृत पहिलवान यांनी सांगितले.प्राथमिक शाळेचे उच्चपदस्थ माजी विद्यार्थी रचना भागवत,सारंग ढोमसे,डॉ.हर्षदा मगर,डॉ.मधुवंती सोनवणे,डॉ.ऋषिकेश जाधव,डॉ ऋतुजा राऊत,डॉ.निकिता मोहिते,यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी नगरसेवक सचिन शिंदे ,गणेश शिंदे,पद्मा शिंदे,दीपक गायकवाड हस्ते करण्यात आला.गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक देवून गौरव करण्यात आला.प्रास्ताविक मुख्याध्यापक किरण जाधव,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिता महाले यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपशिक्षक,दिलीप खोजे, सुनिता देवांग, प्रीती आहेर,अनिता महाले,नीलिमा भागवत,ज्योती गायकवाड, मालन वडे, शालन पैंजणे, यांनी विशेष परिश्रम घेतले.  


 
थोडे नवीन जरा जुने