येवल्यातील सुंदरराम मंदिराची नविन वर्षाच्या स्वागताची शोभायात्रा जल्लोषात

  येवल्यातील सुंदरराम मंदिराची नविन वर्षाच्या स्वागताची शोभायात्रा जल्लोषात

येवला - वार्ताहर
सालाबाद प्रमाणे चैत्र शु ॥ १ गुढीपाडवा निमित्त येवल्यातील सुंदरराम मंदिराची नववर्षाच्या स्वगाताची शोभायात्रा जल्लोषात साजरी झाली.  यावेळी येवले नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष सुरज पटणी यांचे हस्ते श्रीफळ वाढून शोभायात्रेची सुरुवात झाली.शोभायात्रेत आकर्षक सजविलेल्या रथात प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सिता व हनुमानाच्या उत्सव मुर्ती विराजान करण्यात आल्या होत्या. तर सजविलेल्या अश्‍वबग्गीत जगदीशशास्त्री जोशी (त्र्यंबकेश्वर) हे विराजमान झाले होते. पारंपारीक वाद्यांच्या तालात ही शोभायात्रा शहरातील प्रमुख मार्गाने काढण्यांत आली.  शोभायात्रेतील महिला मंडळाच्या झांजरी पथकाने सर्वांचे लक्ष वेधुन घेतले होते.  चौका चौकात ह्या झांजरी पथकाने आपले कौशल्य सादर केले आणि ते सर्वांना भावले. मिरवणुकीत रंगनाथ लुटे, प्रभाकर झळके, मंगेश पैठणकर, संजीव पाटोदकर, धनंजय कुलकर्णी, सोनार सर, अशोक गुजराथी, डॉ. रवी पैठणकर, सदानंद बागुल, किशोर ठाकुर, अमित लाड, विनायक आहेर, गितेश गुजराथी, संदिप बागुल, सुंदरलाल पंडीत, संजय टोणपे, घोंगते, ठोंबरे, सुनिल चारणे, निलेश आहेर, योगेश आहेर, सोनू विखे, पंकज सांबर, ऋतिक क्षत्रिय, गणेश पारवे, आदींसह असंख्य महिला मंडळ, बालगोपाळ
मंडळी शोभायात्रेत सहभागी झाले होते.

थोडे नवीन जरा जुने