येवल्याचे प्रसिद्ध व्यापारी सुरेशचंद संघवी यांच्या संथारा व्रताचा तीसरा दिवस

 


येवल्याचे प्रसिद्ध व्यापारी सुरेशचंद संघवी यांच्या संथारा व्रताचा तीसरा दिवस

 येवला - वार्ताहर

शहरातील प्रसिद्ध व्यापारी सुरेशचंद हरकचंद संघवी यांनी वयाच्या ७२ व्या वर्षी संथारा व्रत धारण केले असून बुधवारी या व्रताचा तीसरा दिवस होता. सद्या शहरात त्यांच्या दर्शनासाठी जैन व जैनेत्तर बांधवांनी संपूर्ण राज्यभरातुन गर्दी केली आहे.
ज्ञान गच्छाधिपती प. पू. प्रकाशचंदजी म. सा. यांचे सुशिष्य प. पू. विरेंद्रमुनीजी म. सा. यांच्या मुखारविंदाने जैन धर्मानुसार शहरातील प्रसिद्ध व्यापारी सुरेशचंद संघवी यांनी संथारा व्रत २७ मार्च रोजी दुपारी ३ वाजून ४० मिनीटांनी अंगीकारले आहे. सर्व धर्मीयांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन येवला जैन श्रावक संघाचे संघपती विजयकुमार श्रीश्रीमाळ यांनी केले आहे.


थोडे नवीन जरा जुने