स्वामी मुक्तानंद प्राथमिक विभाग हुडको वसाहत येथील फॅन्सी ड्रेस स्पर्धेत साकारले विविध पात्र
स्वामी मुक्तानंद प्राथमिक विभाग हुडको वसाहत येथील फॅन्सी ड्रेस स्पर्धेत साकारले विविध पात्र
येवला : वार्ताहर
शहरातील स्वामी मुक्तानंद प्राथमिक विभाग हुडको वसाहत या शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी या फॅन्सी ड्रेस स्पर्धेत सहभाग नोंदवला. सुंदर रंगीत पोषाख परिधान करत अभिनय करणारे चिमुकले, कोणी शिवाजी बनलेले तर कोणी राणी लक्ष्मीबाई, कोणी हनुमान तर कोणी फुलपाखरू, कोणी आदिवासी, राधा- कृष्ण, शंकर, या सर्वामुळे शाळेत आयोजित 'फॅन्सी ड्रेस' स्पर्धेला एकच धमाल आली. या स्पर्धेत एकूण 35 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. परीक्षक म्हणून यांनी काम पहिले. स्पर्धेचे बक्षीस वितरण यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापक किरण जाधव, उपशिक्षक,दिलीप खोजे,अनिता महाले, सुनिता देवांग, प्रीती आहेर,नीलिमा भागवत, ज्योती गायकवाड, मालन वडे, शालन पैंजणे, उपस्थित होत्या.
=============================================
फोटो कॅप्शन - येवल्यातील स्वामी मुक्तानंद प्राथमिक विभाग हुडको वसाहत येथे फॅन्सी ड्रेस स्पर्धेत सहभागी झालेले चिमुकले विद्याथी
_____________________________________________________________________