येवल्यात रामनवमी उत्सव आढावा बैठक संपन्न

 येवल्यात रामनवमी उत्सव आढावा बैठक संपन्न
येवला - वार्ताहर
शहरातील बालाजी गल्ली येथील सुंदरराम मंदिरात रामनवमी उत्सव आढावा बैठक संपन्न झाली.  बैठकीत गुढीपाडवा या नववर्षाची स्वागत मिरवणुक व रामनवमी उत्सवाची रुपरेषा ठरविण्यात आली. 
गुढीपाडव्याचे दिवशी विधीपूर्वक ध्वजारोहण होणार असुन सायंकाळी रामाच्या मुर्ती असलेल्या सुशोभित रथासह सवाद्य शोभायात्रा निघणार आहे.  गुढीपाडव्याचे दुसर्‍या दिवशी पासुन रामनवमी पर्यंत दररोज सायंकाळी ६ वाजता जगदिशशास्त्री जोशी (त्र्यंबकेश्‍वर) यांचे सुश्राव्य प्रवचन होणार आहे.  रामनवमीला रामजन्मोत्सवा निमित्ताने  सकाळी ह.भ.प. गोरख महाराज काळे (अंगणगाव) यांचे किर्तन होऊन महाराआरतीचे आयोजन करण्यात आले आहे.  तसेच सायंकाळी माऊली भक्त मंडळाचा भक्तीगितांचा कार्यक्रम होणार आहे.  रामनवीचे दुसर्‍या दिवशी महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन या सर्व कार्यक्रमास भक्तगणांनी मोठ्या संख्येन उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. 
बैठकी प्रसंगी प्रभाकर झळके, भैय्या ठाकुर, दिनेश श्रीश्रीमाळ, सदानंद बागुल, रंगनाथ लुटे, बंडु आहेर, संदिप बागुल, राहुल गुजराथी, चंद्रकांत पावटेकर, गितेश गुजराथी, आजुमामा जोशी, मंगेश पैठणकर, अमित लाड, भुषण लाड, मंगेश पैठणकर, अक्षय पाठक आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. 

थोडे नवीन जरा जुने