येवल्यातील डॉ.क्षत्रिय यांची तज्ञ मार्गदर्शक म्हणून निवड

 


येवल्यातील डॉ.क्षत्रिय यांची तज्ञ मार्गदर्शक म्हणून निवड

 

 

येवला प्रतिनिधी

येथील स्त्री रोग तज्ञ डॉ. चंद्रशेखर क्षत्रीय यांची पुणे येथे होणार्‍या ३२ व्या वार्षिक राज्यस्तरीय अमाग्स

(एएमओजीएस) परिषदेसाठी तज्ञ मार्गदर्शक म्हणून निवड झाली आहे. राज्यभरातील स्त्री रोग तज्ञांच्या या परिषदेत ते मार्गदर्शन करणार आहे.

असोसिएशन ऑफ महाराष्ट्र ऑफ ऑबस्टॅटीक ऍण्ड गायनॅकोलॉजिकल सोसायटीच्या वतीने पुणे येथे ८ ते ११ फेब्रुवारीच्या दरम्यान ही परिषद होणार आहे. स्त्री रोग विभागातील विविध आजार व त्यावरील उपचार यासंदर्भात चर्चा करण्यासाठी ही परिषद होणार असून राज्यातील सुमारे २ हजारावर डॉक्टर यात सहभागी होणार आहे. स्त्रीयांच्या गुंतागुंतीच्या प्रसुती व स्त्रीयांच्या सर्व प्रकारच्या लॅप्रास्कोपीक शस्त्रक्रिया या विषयावर प्रधान्याने या चार दिवसीय परिषदेत चर्चा होणार आहे. विविध विषयांवर राष्ट्रीय स्तरावरील तज्ञ मार्गदर्शक यावेळी मार्गदर्शन करणार असून यात डॉ. क्षत्रीय यांचा समावेश आहे.

या परिषदेत मार्गदर्शक म्हणून सहभागी होणारे ते तालुका पातळीवरील एकमेव तज्ञ आहे. एक्टोपीक प्रसुती म्हणजेच गर्भाशयाच्या बाहेर असलेली व मातृत्वाला धोकेदायक ठरणारी प्रसुती यावर डॉ. क्षत्रीय मार्गदर्शन करणार आहे. विशेष म्हणजे परिषदेच्या निमित्ताने होणार्‍या सांस्कृतिक कार्यक्रमात देखील त्यांचा उल्लेखनीय सहभाग राहणार आहे. येथील ते प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ असून यापूर्वी त्यांनी अनेक राष्ट्रीय स्तरावरील परिषदांमध्ये सहभागी होऊन मार्गदर्शन केलेले आहे.  


थोडे नवीन जरा जुने