भारताचा 72 वा स्वातंत्र्यदिन राधिका इंटरनॅशनल स्कूल , येवला येथे उत्साहात साजराभारताचा 72 वा स्वातंत्र्यदिन राधिका इंटरनॅशनल स्कूल , येवला येथे उत्साहात साजरा
 
येवला - ( सुदर्शन खिल्लारे )

स्वतंत्र भारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात राधिका इंटरनॅशनल स्कूल, येवला  शाळेच्या प्रांगणात पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून वीर चक्र प्राप्त केलेले येवला तालुक्याचे माजी सैनिक मेजर कचरू साळवे यांची उपस्थिती लाभली. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर प्रमुख पाहुणे व श्री कुणालजी धुमाळ सर, श्री अमितजी पटेल , श्री योगेशजी जहागीरदार, श्री विजयकुमार श्रीश्रीमाळ, श्री रीतेशजी बुब , श्री प्रज्वलजी पटेल, श्री दादासाहेब शेटे, श्री काशिनाथजी धुमाळ ,श्री सिद्धार्थ पारख, श्री मोंटीभाऊ परदेशी.  श्री ज्ञानेश्वर चव्हाण ( आर्मी ) श्री दीपक सोमवंशी ( आर्मी ) यांचे हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर शाळेच्यावतीने सर्व मान्यवरांचा गुलाबपुष्प व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.    
'कदम कदम बढाये जा ! ' या  गीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर  अनेक सुंदर देशभक्तीपर गीत , नृत्य व गायन तसेच ड्रामा विद्यार्थांनी सादर केले. ' भगतसिंग,राजगुरू,सुखदेव यांचा फासीचा प्रसंग ' या नाटकरूपी प्रदर्शनाने प्रमुख पाहुणे , उपस्थित जनसमुदाय व पालकवर्ग अतिशय भाऊक  करून गेला सर्वांच्या डोळ्यात अश्रू आले . त्यानंतर शाळेचे प्राचार्य श्रीसुनीलकुमार सर यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त भाषणाद्वारे विद्यार्थ्यांना संबोधित केले. त्यानंतर संस्थेचे सचिव श्री कुणालाजी धुमाळ यांनी थोडक्यात संस्थेचा आढावा घेतला तसेच त्यांनी देखील विद्यार्थ्यांना व पालक वर्गाला संबोधित केले तसेच 
. श्री योगेशजी जहागीरदार यांनी उत्कृष्ठ भाषण केले .कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री साळवे साहेब यांनी आपल्या भाषणातून शाळेचे व शाळेच्या संस्थापकांचे अतिशय कौतुक केले. पुढे त्यांनी स्वतः सैनिक असतानाच्या आठवणीला उजाळा दिला. शाळेच्या कार्यक्रमाचे व शाळेचे कौतुक करतांना त्यांना गहिरून आले.   आपल्या भाषणाद्वारे त्यांनी विद्यार्थ्यांना व पालकवर्गाला संबोधित केले.पालकांना तर्फे पत्रकार सुदर्शन खिल्लारे यांनी आभार व्यक्त केले
 सौ. प्रियांका क्षत्रिय  मॅडम, सौ.शोभा रणमाळे मॅडम व कु. ममता परदेशी मॅडम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सौ.वर्षा बोरसे मॅडम यांनी उपस्थित पाहुण्यांचे आभार प्रकट केले. शाळेतील शिक्षक व शिक्षकेइतर कर्मचारी वृंद यांनी उत्तम प्रकारे  कार्यक्रमाची रूपरेषा आखून मोलाचे योगदान दिले.

थोडे नवीन जरा जुने