सई ग्रीन इंग्लिश मेडिअम स्कुलमध्ये स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा



      सई ग्रीन इंग्लिश मेडिअम स्कुलमध्ये स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा


येवला : प्रतिनिधी
     कला संस्कृती, शिक्षण प्रसारक मंडळ औरंगाबाद संचलित 'सई ग्रीन इंग्लिश मेडिअम स्कुल' , नगरसुल या शाळेत स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहाने पार पाडण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. अरूणाताई भड आणी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. रविंद्र भड हे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अर्चणा गायकवाड व प्रशासकीय अधिकारी प्राचार्य श्री भालेराव सर आणि श्री सचिन पैठणकर यांनी केलेले होते. तसेच शळेतील बालविद्यार्थिनींनी तसेच बालविद्यार्थ्यांनीही उत्युकपणे भाषणे सादर केली. कवायती सादर केली. सर्व शिक्षकांनाही स्वातंत्र्यदिनाचे महत्व पटवून दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. - सपना जाधव, अनुमोदन - सविता चंदनशिव, आभार प्रदर्शन-सौ. ज्योती शिंदे, कार्यक्रमाबद्दल मार्गदर्शन - सौ. प्रियांका येवले, स्वातंत्र्यदिनाचे महत्व - कविता चंदनशिव व सोनवणे म्याडम यांनी केले. अशा प्रकारे स्वातंत्र्यदिन  उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रम यशस्वितेसाठी प्रशासन अधिकारी  मा.श्री सुभाष भालेराव सर मुरव्याध्यापिका साै.अर्चना गायकवाड सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
थोडे नवीन जरा जुने