एसएनडी अभियांत्रिकीत विध्यार्थ्यांना मिळाल्या इलेक्ट्रीकल सॉफ्टवेअरच्या टिप्स



एसएनडी अभियांत्रिकीत विध्यार्थ्यांना मिळाल्या इलेक्ट्रीकल सॉफ्टवेअरच्या टिप्स

 


येवला  : प्रतिनिधी


जगदंबा शिक्षण संस्थेच्या बाभूळगाव येथील एस.एन.डी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना इलेक्ट्रीकलसह विविध सॉफ्टवेअरच्या गरजा व त्याचा वापर याविषयी बहुमूल्य मार्गदर्शक टिप्स मिळाल्या.

महाविद्यालयाच्या विद्युत अभियांत्रिकी विभागातर्फे तृतीय व चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांसाठी पीएलसी आणि स्काडा- इलेक्ट्रीकल ऑटो कॅड या विषयावर एक दिवसीय मोफत सेमिनार आयोजित करण्यात आले होते.इंजी. उमेश सूर्यवंशी यांनी या विषयावर मार्गदर्शन करून टिप्स दिल्या.एस.एन.डी अभियांत्रिकीसह,एसएनडी तंत्रनिकेतन,मातोश्री तंत्रनिकेतन व जिल्ह्यातील इतर तंत्रनिकेतन महाविद्यालयातील सुमारे २०० विद्यार्थी सहभागी झाले होते.या सॉफ्टवेअरचा उपयोग अभियांत्रिकीच्या वेगवेगळ्या क्षेत्रात होतो आणि कमी वेळेत चांगल्या डिझाईन ह्या सॉफ्टवेअर मुळे करता येतात. भविष्यकालीन विध्यार्थी हित लक्षात घेऊन विध्यार्थ्यानी अश्या अत्याधुनिक सॉफ्टवेअरचा वापर करावा असे आवाहन यावेळी सूर्यवंशी यांनी केले. सेमिनारसाठी विद्युत अभियांत्रिकी विभागाचे सर्व प्राध्यापक उपस्थित होते.सेमिनारचे संयोजन प्रा.अविनाश हाडोळे यांनी केले.प्राचार्य एच.एन.कुदळ,विद्युत अभियांत्रिकीचे विभाग प्रमुख प्रा.पवन टापरे यांनी विद्यार्थ्यांना यावेळी मार्गदर्शन केले.

फोटो Yeola 23_4

बाभूळगाव : एस.एन.डी अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना इंजी. उमेश सूर्यवंशी.



 
 

थोडे नवीन जरा जुने