चिचोंडी येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साज

चिचोंडी येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा 

समता प्रतिष्ठान येवला संचलित आदर्श माध्यमिक चिचोंडी विद्यालयात आज १५आँगष्ट  स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वि.वि.का.सोसायटीचे चेरमन श्री.साहेबराव मढवई हे तर  ध्वजपुजन सैन्यात सेवेत असलेले चिचोंडीतील भूमिपुत्र सैनिक सोपान कुटे , गणेश कैलास मढवई,विलास मढवई,किरण मढवई,उपसरपंच नंदूभाऊ घोटेकर, सोसायटी मा चेरमण बाबासाहेब शिंदे ,ग्रामपंचायत सदस्या ,मंदाताई खराटे,सविता धिवर,रंजना राजगुरू या सर्वांनी ध्वजपुजन केले तर ध्वजारोहण चिचोंडी गावचे  प्रथमनागरिक रविभाऊ गुंजाळ यांच्या हस्ते करण्यात आले.स्वागतगीतानी पाहुण्याचे स्वागत करण्यात आले कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांनी गिते,भाषणे ,बेटीबचाव एकपात्री नाटिका, या व्दारे प्रेक्षकांची मने जिंकून अनेक बक्षिसे मिळविली.व सामुदायिक कवायत  सादरीकरण केले सांस्कृतिक कार्यक्रमाला ताल,लय,स्वर याची साथ शिक्षक शरद शेजवळ, आप्पासाहेब शिंदे गोरखनाथ खराटे यांनी केली.तसेच तंबाखू मुक्त गाव प्रतिज्ञा घेण्यात आली. मार्च 2018 एस.एस.सी बोर्डाच्या परीक्षेत प्रथम क्र.शुभांगी मढवई,व्दितीय क्र. सचिन रोडे ,त्रुतिय क्र.माधूरी काळे या तिघांनाही बक्षीस रूपाने रोख रक्कम विद्यालयाचे माजी विद्यार्थी व शिक्षक म्हणून सेवेत असलेले श्री.मिलिंद गुंजाळ सर,व रंगनाथ गुंजाळ सर यांची मुलगी कु.स्नेहल रंगनाथ गुंजाळ हिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दुसरीकडे पैसे खर्च न करता मुंलाना प्रोत्साहन देण्यासाठी ही रोक रक्कम दरवर्षी देण्यात येऊन मुलांचे कौतुक करण्यात येते. कार्यक्रमाचे.प्रास्ताविक मुख्याध्यापक रामनाथ पाटील यांनी केले तर सुत्रसंचालन आप्पासाहेब शिंदे यांनी केले. कार्यक्रमास मच्छिंद्र मढवई, शोभाताई मढवई,अरुणा सोनवणे,शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष नारायण खराटे,सुरेश मढवई, सकाळचे पत्रकार प्रमोद पाटील,डॉ. पैठणकर ,मनोहर गुंजाळ, भाऊसाहेब ढोले, सुनील पवार,शिवाजी निमसे, राजेंद्र घोटेकर,बाळू घोटेकर, प्रकाश राजगुरू, राजेंद्र राजगुरू, बन्सी गुंजाळ, श्यामराव गायकवाड, गुलाबराव पवार, भास्करभाऊ कोकाटे, संजय मढवई संतोष मेथे ,बाबासाहेब जाधव ,तुषार चव्हाण, प्रांजल मढवई,विकास भाकरे,सोमोदय मढवई,बाळू खराटे, राहूल गुंजाळ, राजू गुंजाळ,सोनार मामा अदिग्रामस्थ व माजी विद्यार्थी व शिक्षक शिक्षकेत्तर उपस्थित होते आभार उत्तम बंड यांनी मानले.
थोडे नवीन जरा जुने