लेक वाचवा लेक शिकवाच्या माध्यमातून ९७ मुलींच्या नावाने घराला लावल्या मुलींच्य नावाने नेमप्लेट

लेक वाचवा लेक शिकवाच्या माध्यमातून ९७ मुलींच्या नावाने घराला लावल्या मुलींच्य नावाने नेमप्लेट

येवला : प्रतिनिधी

प्रहार जनशक्ती पक्षाचे श्री संतोषभाऊ थोरे (नाशिक जिल्हाउपाध्यक्ष) यांच्या वाढदिवसानिमित्त येवला तालुक्यातील नगरसुल येथे
 दत्तू बोडके(उत्तर महाराष्ट्र संम्पर्क प्रमुख) अनिल भडांगे(नाशिक जिल्हाप्रमुख) यांच्या मार्गदर्शना खाली व
तालुकाप्रमुख अमोल फरताळे व समाजसेवक भाऊसाहेब गाडे
 यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता

कार्यक्रमाच्या वेळी गरीब मुलांना वह्या ,पेन व चॉकलेट वाटप केली. त्या नंतर गावातून प्रभात फेरी काढण्यात आली व शाळेतील प्रतेक मुलीच्या घरी जाऊन तिला ओवाळून तिच्या नावाची नेमप्लेट तिच्या घराला लावण्यात आली 
या उपक्रमाचे गावकऱ्यांनी व मुलींच्या पालकांनी भरभरून कौतुक केले.

कार्यक्रमा प्रसंगी गावातील सरपंच प्रसाद पाटील , संतोष मुंडे सर,अशोक भांडे ,सचिन गोरडे ,कोपनर, भिवसेन ,मिनल गुगळे ,वैशाली कुड्के ,प्रतिभा मोरे , जयश्री कापडनिस , 
प्रहार जनशक्ति पक्षाचे किरण निकम, आकाश निकम, रोशन नागरे, बाबासाहेब कोल्हे  इ.कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने