मुलांना शाळेतच मिळणार बँकेचे व्यवहार ज्ञान.

 मुलांना शाळेतच मिळणार बँकेचे व्यवहार ज्ञान.

येवला : प्रतिनिधी
तालुक्यातील मानोरी  जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ही विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचे तसेच संगणकीय प्रणाली द्वारे शिक्षणाचे धडे दिले जात आहेत.या संगणकीय शिक्षण प्रणाली मूळे चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणात मोठी भर पडत असल्याचे बघायला मिळत आहे .या शिक्षणाबरोबर नवनवीन उपक्रम शाळेत राबवून आर्थिक व्यवहारांची देवाण घेवाण कशी करायची याचाच प्रत्यय म्हणून येवला तालुक्यात पहिल्यांदा मानोरी बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक अगरचंद शिंदे आणि शिक्षक राजू सानप यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना पैशांची बचत व्हावी यासाठी शाळेत  "  चिड्रन  बँक ऑफ मानोरी बु " स्थापना करण्यात आली आहे.इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत चे 42 विद्यार्थी शिक्षण घेत आहे.बँक निर्मिती मूळे विद्यार्थ्यांना लहान वयातच पैसे बचतीची सवय होणार आहे .सरकारी बँक प्रमाणे च या शाळेतील बँकेत व्यवहाराची माहिती मिळणार आहे.गोळ्या , चॉकलेट खाण्यासाठी आणलेले पैसे विनाकारण खर्च होतात.म्हणून याच पैशाला वेगळा फाटा देत   बँकेद्वारे विद्यार्थ्यांना आपला छोटासा शालेय खर्च या बचत बँकेतून करता येणार आहे.
                       यात प्रत्येक विद्यार्थ्यांचे अर्ज भरून खाते उघडण्यात आले आहे.बँकेचा लोगो तयार करण्यात आला असून ओळखपत्र पण देण्यात आले आहे. पैसे भरण्यासाठी किवा काढण्यासाठी स्लिप द्वारे सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. विशेष म्हणजे बँक कर्मचारी म्हणून विद्यार्थ्यांचीच नियुक्ती करण्यात आली आहे.शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी या बँकेतून पैसे काढता येऊ शकतात.
शाळेतील या नवीन उपक्रमांतर्गत सुरू केलेल्या बँकेतील व्यवहार बघण्यासाठी गावातील नागरिक आवर्जून भेटी देत असून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
            उदघाटनाप्रसंगी संपर्क अधिकारी सोनाली बैरागी,ग्रामसेवक बाळासाहेब कुशारे , प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अगरचंद शिंदे सर,राजू सानप सर,ग्रामपंचायत सदस्य पोपट शेळके,अप्पासाहेब शेळके,गरुड गाडेकर,विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन नंदाराम शेळके,शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष उपजिल्हाप्रमुख सुनिल शेळके,पोलीस पाटील अप्पासाहेब शेळके,रोहन वावधाने,अंगणवाडी सेविका संगीता कवीश्वर , आशा कार्यकर्त्या सुवर्णा भवर ,ग्रामपंचायत शिपाई तुकाराम शेळके तसेच बाबासाहेब तिपायले, भाऊसाहेब फापाळे, आनंदा गायकवाड, साहेबराव शेळके, देवराम शेळके,विठ्ठल वावधाने, शेखर वावधाने, रोशन वावधाने, वैभव वावधाने,अनुराग जोशी ,संजय खैरनार, विठ्ठल तिपायले, अनिल भवर ,सुरेश शेळके ,वसंत शेळके ,गणेश साठे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटो : मानोरी येथील प्राथमिक शाळेत चिड्रन बँकेच्या उदघाटनाप्रसंगी मुख्याध्यापक अगरचंद शिंदे, राजू सानप सर,उपस्थित ग्रामस्थ
थोडे नवीन जरा जुने