सायगाव येथे बकरी ईदच्या निमित्ताने येवला उपसभापती रुपचंदभाऊ भागवत यांनी दिल्या शुभेच्छा
सायगाव येथील महादेववाडी येथील मस्जिद मध्ये जाऊन उपसभापती रुपचंदभाऊ भागवत यांनी सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी रुपचंदभाऊ यांनी मुस्लिम धर्माचे रितीरिवाज, रुढीपरंपरा नुसार चाललेली मुस्लिम संस्कृती जपणारे मौलाना, तसेच सायगावचे तंटा मुक्तीचे अध्यक्ष उस्मान शेख, मस्जिद मध्ये नियमित नमाज पठाण करणारे बबनभाई शेख, बाबूलाल शेख यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार केला व सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. अतिथी देवो भवं प्रमाणे उस्मान भाई शेख यांनी उपस्थित रुपचंदभाऊ भागवत, देविदास जानराव सर, ज्ञानेश्वर भागवत यांचा देखील सत्कार करून ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी सलीम शेख, जावेद शेख, कडूभाई शेख, मुनीरभाई शेख, हसनभाई शेख, रशीदभाई शेख, आशपाक शेख, जाकिर भाई, भैय्या शेख, रियाज शेख, समीर शेख, अल्ताफ शेख, जगनबाबा मुळे, योगेश जठार सह आदी उपस्थित होते*