शिक्षकांच्या भावना समजून घेऊन समस्या तत्परतेने सोडवाव्यात
शिक्षक दरबारात आमदार किशोर दराडे यांचे अधिकाऱ्यांना सूचना
येवला : प्रतिनिधी
शिक्षकांचे अनेक प्रश्न असून यासाठी ते शाशकीय कार्यालयात वारवार चकरा मारतात.अधिकाऱ्यांनी त्यांच्या भावना व अडचणी समजून घेत या समस्या तत्परतेने सोडवाव्यात म्हणजे तक्रारीचे प्रमाण कमी होईल. अधिकाऱ्यांनी सहकार्य करत आगामी १५ दिवसांत शिक्षक दरबारात मांडलेले सर्व प्रश्न निकाली काढावेत अशा सूचना शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी केल्या. तसेच मंत्रालयातील प्रलंबित प्रश्न असतील तर तेही सोडविण्यासाठी पाठपुरावा करत राहील असेही ते म्हणाले.
मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालयात आज शिक्षक मतदारसंघातील शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी शिक्षक दरबार या मतदार संघाचे आमदार किशोर दराडे व नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघटना च्या वतीने घेण्यात आला .
या दरबार प्रंसगी विधान परिषद आ.नरेंद्र दराडे, शिक्षक आ.किशोर दराडे शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव,माध्यमिक/ प्राथमिक शिक्षण अधिकारी नितीन बच्छाव भविष्य निर्वाह निधी अधिक्षक उदय देवरे,शिक्षक सेनेचे विभागीय अध्यक्ष संजय चव्हाण, मुख्य ध्यापक संघाचे अध्यक्ष एस.के.सावंत, सेक्रेटरी एस.बी.देशमुख, मार्गदर्शक सुरेश शेलार, विद्यासचिव बी.डी.गांगुर्डे, सहकार्यावाहक दिपक व्याळीज,सदस्य संजय देसले, के.पी.वाघ यांच्या नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर येथील शिक्षण अधिकारी,शिक्षक संघटना. शिक्षक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या शिक्षक दरबारात एकुण १६ विषयावर चर्चा करण्यात आली. त्या मध्ये मा.उच्च न्यायाल यांच्या आदेशान्वये पेन्शन योजना बाबत कार्यवाही होणे बाबत चर्चा,प्राथमिक, माध्यमिक व उच्च शिक्षकांच्या शालार्थ आडी ( ID) निर्णय घेणे, आर.टी.ई. प्रमाणपत्र वितरित करण्यातील अडचणी बाबत चर्चा करणे, सन २०१२ नंतर नियुक्त केलेल्या वैयक्तीक मान्येबाबत,अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या ,संस्था चालकांवर दबाव आपणयासाठी धोरण निश्चिती , २००६ च्या दप्तर दिरंगाई, सेवा जेष्टता यादी, भविष्य निर्वाह निधी पावत्या मिळणे, वैद्यकीय बिल,महिन्या च्या १ तारखेला नियमित वेतन होणे, अल्पसंख्याक शाळांच्या समस्या. नियुक्ती व अनुशेषाबाबत खुलासा, वरीष्ट व निवड श्रेणी,लेखाधिकारी विषयी तक्रार असल्या संदभात निर्णय, वादग्रस्त संस्था बाबत निर्णय, आदी विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी अनेक शिक्षकांनी या संदर्भात प्रश्न विचारले विषया नुसार अधिकारांनी प्रश्न उत्तर दिली. तसेच आ. दराडे यांनी अधिकार्यांना सुचना केल्या. नाशिक च्या वतीने अपंग शिक्षकांच्या समस्या वर व ऐनवेळच्या विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी उपसंचालक जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले या शिक्षक दरबारातील सर्व प्रश्न अधिकारी सोडवल्या शिवाय राहणार नाही. जेवढ्या ऑडर निघतील त्या आमदारांच्या हस्ते वितरण केले जाईल. यावेळी आ.किशोर दराडे म्हणाले की,सर्व प्रथम शिक्षकांचे आभार मानतो त्यांनी मला शिक्षक आमदार म्हणजे निवडून दिले. तुमचे मत वाया जाणार नाही त्या साठी शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी शिक्षण दरबाराचे आयोजित केला आहे.
फोटो
एकलहरे: शिक्षक दरबार प्रसंगी आमदार किशोर दराडे, आमदार नरेंद्र दराडे, शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव आदी