इजि. साहेबराव सैद राज्यस्तरीय शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानीत

इजि. साहेबराव सैद राज्यस्तरीय शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानीत

 येवला   : प्रतिनिधी

शिवपुत्र संभाजी राजे बहुउद्देशीय संस्था नाशिक यांच्या वतीने जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त उपविभागीय अधिकारी तथा बाजार समिती संचालक इंजि. साहेबराव सैद यांना मानाचा राज्यस्तरीय शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.
शहरातील महात्मा फुले नाट्यगृहात सन २०१७-१८ चा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. अध्यक्षस्थानी पदवीधर आमदार डॉ. सुधिर तांबे होते. प्रमुख अतिथी म्हणून शिक्षक आमदार किशोर दराडे, इतिहासाचार्य डॉ. स्मिता देशमुख, माजी आमदार मारोतराव पवार होते. शिवपुत्र संभाजी राजे बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने दरवर्षी समाजातील विविध क्षेत्रात सामाजिक काम करणार्‍या व्यक्तींना शिपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात येते. कार्यक्रमाची सुरुवात माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करुन करण्यात आली. यावेळी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात काम करणार्‍या तेरा व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. येथील सेवानिवृत्त इजि. साहेबराव सैद यांनाही मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. डॉ. सुधिर तांबे, डॉ. स्मिता देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमा ससंभाजी पवार, धनंजय कुलकर्णी,  किशोर सोनवणे, मकरंद सोनवणे, संतु पा. झांबरे, अर्जुन कोकाटे, बाळासाहेब दौंडे, पी. के. काळे, विठ्ठलराव आठशेरे, अशोकराव गायकवाड आदींसह मान्यवर उपस्थित होते. पुरस्कार मिळाल्याबद्दल सैद यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

थोडे नवीन जरा जुने