शासनाकडुन अनुदानीत तत्वावर पाणी शुध्दीकरण यंत्र मिळावे

 

 शासनाकडुन अनुदानीत तत्वावर पाणी शुध्दीकरण यंत्र मिळावे

येवला : प्रतिनिधी
साताळी ता येवला येथील ग्राम पंचायतची ग्राम सभा येवला तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष तथा साताळीचे सरपंच भाऊसाहेब कळसकर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामविकासाच्या विविध योजनावर चर्चा करत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली
परीसरातील विहीरींचे शेतीसाठी वापरले जाणारे पाणी क्षारयुक्त झाल्याने शासनाकडुन अनुदानीत तत्वावर पाणी शुध्दीकरण यंत्र मिळावेत असा ठराव यावेळी केला.

यावेळी सरपंच भाऊसाहेब कळसकर यांनी १४ वा वित्त आयोग,जनसुविधा योजना,समाज कल्याण योजना ,मग्रारोहयो आदी योजनांमधुन केलेल्या केलेल्या व प्रस्तावित केलेल्या विविध कामांची माहीती ग्रामसभेस दिली.स्वच्छ भारत अभियान व स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८ साठी संपर्क प्रमुख मुखेड आरोग्य केंद्रांचे सहाय्यक मढवई नाना यांनी ग्रामस्थांना स्वच्छ सर्वेक्षण व प्लास्टीक बंदीची व घ्यावयाच्या काळजीची माहीती दिली चिचोंडी आरोग्य केंद्रांचे आरोग्यसेवक वामन पैठणकर यांनी मार्गदर्शन करत प्लास्टीक बंदीची ग्रामस्थांना शपथ दिली
 यावेळी उपसरपंच सुमनबाई कोकाटे,माजी उपसरपंच शहाजीराजे काळे,येवला तालुका राष्ट्रवादी किसानसभेचे अध्यक्ष तुळशीराम कोकाटे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्ताजी काळे,वाल्मिक काळे,वेणुनाथ राजगुरू,अभिमन्यु आहेर,कृषी सहाय्यक सोमनाथ काळे,बबन कोकाटे,दिपक कोकाटे,गोरख सोनवणे,दशरथ जाधव,तुषार सोनवणे,ग्रामसेवक साईनाथ चिलगर,अंगणवाडी सेविका संगीता गुंजाळ,सुरेखा पगारे ,वसंत मोरे आदी ग्रामस्थ उपस्थीत होते

थोडे नवीन जरा जुने