येवल्यात संत शिरोमनी नामदेव महाराजांच्या प्रतिमेची पालखी मिरवणूक

 

येवल्यात संत शिरोमनी नामदेव महाराजांच्या प्रतिमेची पालखी मिरवणूक


येवला :  प्रतिनिधी
 येथील नामदेव शिंपी समाजाचे वतीने श्री संत नामदेव विठ्ठल मंदिर, शिंपी गल्ली येथे श्री संत शिरोमनी श्री नामदेव महाराज परिवार व संत जनाबाई यांच्या ६६८ व्या संजीवनी समाधी सोहळ्या निमित्त श्री ग्रंथराज ज्ञानेश्‍वरी पारायण हरिनाम सप्ताहाचे  आयोजन करण्यांत आले होते.  सप्ताहाची सांगता काल्याचे किर्तनाने झाली.  याप्रसंगी संत नामदेव महाराजांच्या प्रतिमेची गावातुन मिवणुक काढण्यात आली.
सप्ताह दरम्यान दररोज ज्ञानेश्वरी ग्रंथाचे सामुहिक पठण, भजन, हरिपाठ, भारूड  आदी मोठ्या उत्साहात साजरा करण्यांत आला.   शुक्रवारी श्री संत शिरोमनी नामदेव महाराज यांच्या प्रतिमेची व पालखीची भव्य मिरवणूक टाळ, मृदंगाचे गजरात काढण्यांत आली. याप्रसंगी समाजबांधव मोठ्या संख्येने सामील झाले होते. 
सप्ताह कार्यक्रम यशस्वीततेसाठी समाजाचे अध्यक्ष अरविंद तुपसाखरे, उपाध्यक्ष राजेंद्र गणोरे, चिटणीस कैलास बकरे, नंदलाल भांबारे, सोमनाथ हाबडे, दत्तात्रय लचके, रमेश भांबारे, रविंन्द्र हाबडे, श्रीकांत खंदारे, मुकेश लचके, संतोष खंदारे, रामेश्‍वर भांबारे, सुहास भांबारे, जयवंत खांबेकर, संतोष टिभे, प्रकाश कल्याणकर, प्रदिप लचके, ज्ञानेश टिभे, राजेश माळवे, मंगेश खंदारे, राहुल भांबारे, राजेंद्र लचके, राजेंद्र कल्याणकर,प्रेम वारे, सागर मोतिवाले, प्रकाश खंदारे, विश्वेश टिभे, आदींसह समाजबांधवानी विशेष परिश्रम घेतले.


थोडे नवीन जरा जुने