येवल्यातील संगणक परीचालकांचे कामबंद आंदोलन.

येवल्यातील संगणक परीचालकांचे कामबंद आंदोलन.

 येवला : प्रतिनिधी
आपले  सरकार सेवा केंद्रातील येवला तालुक्यातील ग्रामपंचायत च्या सर्व संगणक परीचालकांचे मागील 6 महिन्यापासून थकीत मानधन न मिळाल्याने 24 सप्टेंबर पासुन बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे.शासनाच्या डिजिटल इंडिया योजनेच्या विविध प्रकारच्या ग्रामपंचायत स्तरावर आपले सरकार सेवा केंद्र सुरु केले असून यासाठी संगणक परीचालकांची नियुक्ती करण्यात आली आहे.परंतु कंपनीच्या चुकीच्या धोरणामुळे संगणक परीचालकांचे काम करूनही मानधन वेळेवर मिळत नसल्याने उपासवारीची वेळ निर्माण झाली आहे. 
             याबाबत अनेकदा जिल्हा व्यवस्थापक, प्रोजेक्ट मॅनेजर  ,प्रकल्प व्यवस्थापक  यांना अनेकदा यासंबंधी माहिती देऊनही संगणक परीचालकांच्या मानधनाचा प्रश्न सुटेना.याचे नेमकी कारण काय ? तसेच मानधन देण्याची जबाबदारी ही कंपनीची असून कंपनीकडून कोणतीही जबाबदारी पार पाडत नसल्याचे दिसून येत आहे. ही कंपनी फक्त संगणक परीचालकांकडून कामच करून घेत असून ही बाब अन्याय कारक असून संगणक परीचालकांना मानधन निश्चित तारखेला देण्यात आले पाहिजे. या सर्व गोष्टींकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.संगणक परीचालकांनी आज पर्यंत स्वच्छ भारत मिशन ,निर्मल / स्वच्छ भारत अभियानाचा सर्वे, प्रधानमंत्री घरकुल आवास योजना ,नरेगाची ऑनलाईन फोटो आणि माहिती ऑनलाइन करणे, छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी  शेतकरी सन्मान योजनेचे काम रात्र दिवस करूनही अद्याप त्याचा मोबदला मिळालेला नाही.गेल्या दोन वर्षांपासून कंपनीच्या चुकीच्या धोरणामुळे संगणक परीचालकांचे 6 ते 7 महिन्यापासून थकीत मानधन न मिळाले नसून , काम बंद शिवाय दुसरा पर्याय नसल्याने जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या संगणक परीचालकांचे काम बंद आंदोलन सुरू राहणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

◆ एप्रिल ,मे ,जून 2017 चे मानधनाचे पैसे कंपनी ला देऊन 1 वर्ष झालेले असून कंपनीच्या बोगस कारभारामुळे अद्याप संगणक परीचालकांना मानधन मिळाले नाही.
◆ थकीत मानधन व्याजासह खात्यात जमा करावे.
◆ जिल्ह्यात ग्रामपंचायत कडून जुलै2018 पासून पुढील 9 महिन्याचे धनादेश जिल्हा परिषद ला दिले असून अद्याप जून 2018 पर्यंत चे थकीत मानधन ही जमा झालेले नाही.त्यामुळे यापुढचे मानधन कधी आणि कसे होणार याची शाश्वती नाही.
◆ बऱ्याच संगणक परीचालकांचे इन्व्हाईस डीम ( पेंडीग ) असल्याने मानधन मिळत नाही.
◆ पंचायत समिती मधील संगणक परीचालकांना आपले सरकार केंद्रात कायमस्वरूपी करण्यात यावे.
◆ अनेक ग्रामपंचायत चे नकाशे चुकीचे झालेले असून त्यामुळे इन्व्हाईस क्लेम करता आलेले नाही
.◆ इन्व्हाईस क्लेम करताना अनेक प्रकारच्या अडचणीमुळे संगणक परीचालकांचे मानधन झालेले नाही.

फोटो : गटविकास अधिकारी सुनील आहिरे यांना विविध मागण्याचे निवेदन देताना संगणक परिचालक
थोडे नवीन जरा जुने