पाणी वाटप संस्थांचे नवीन प्रचलित मॉडेल शेतकऱ्यांच्या हिताचे- राजेश मोरे बाबा डमाळे यांच्याशिष्टमंडळाला आश्वासन

पाणी वाटप संस्थांचे नवीन प्रचलित मॉडेल शेतकऱ्यांच्या हिताचे- राजेश मोरे 
बाबा डमाळे यांच्याशिष्टमंडळाला आश्वासन
येवला : प्रतिनिधी
पाटबंधारे विभागाच्या पाणी वाटप सहकारी संस्थांसाठी शासनाने नवीन प्रचलित केलेल्या मॉडेलची अंमलबजावणी करून नूतनीकरण करावे.त्यामुळे समान पाणी वाटपा बरोबरच शेतकऱ्यांच्या हिताचे ठरेल व त्याचे स्वागत नक्कीच होईल असा आशावाद नाशिक विभागीय पाटबंधारे अधीक्षक अभियंता  राजेश मोरे यांनी व्यक्त केले .
पालखेड कालव्यावरील पाणी वाटप सहकारी संस्था चालक ,अध्यक्ष व शेतकऱ्यांच्या विविध मागण्या  व प्रश्नांवर भाजपा नेते बाबा डमाळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने भेट घेतली असता मोरे पुढे म्हणाले की वाल्मी ह्या पाणी विषयाचा अभ्यास करणाऱ्या संस्थेने शासनाला पाणी वापर संस्था साठी नवीन मॉडेल सादर केले आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे अनेक प्रकारचे मार्गदर्शन मिळत आहेत. शेतकऱ्यांपर्यंत ही योजना पोहोच झाल्यास त्याचे निश्चित स्वागत होईल. वाघाळा प्रकल्पाने या योजनेची सर्वाधिक अगोदर अंमलबजावणी केली असून महाराष्ट्र व परदेशातील जलतज्ञ याची दखल घेत असल्याचे राजेश मोरे म्हणाले.
याप्रसंगी शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले पाणी वाटप संस्थांना कोठ्या पद्धतीने पूर्ण क्षमतेने पाणी देऊन संपूर्ण सिंचन झाल्यानंतर अध्यक्षांच्या दाखल्या नंतर चाऱ्या बंद करण्यात यावा, पाणी वाटपाचे मोजमाप( गेज) नियंत्रणे बसवण्यात यावेत, अधिकारी व  कर्मचाऱ्यांमार्फत संस्थाचालक व शेतकऱ्यांवर आरोपीं सारखी वागणूक मिळते. अरे रावी होते.  त्यांना सन्मानाने वागणूक मिळावी अशा विविध प्रकारच्या मागण्यांचे निवेदन राजेश मोरे यांना देण्यात आले. याप्रसंगी बाबा डमाळे यांच्या बरोबर माजी सभापती बबनराव मढवई, ज्ञानेश्वर मढवई, श्यामराव मढवई, सचिन आहेर, अण्णासाहेब जाधव, बाळासाहेब काळे, के. वाय. पाटील, दिगंबर लोणारी, कृष्णा पोटे, जगन्नाथ वर्पे सौ कोमल वर्दे ,सौ सुमन ताई पवार, सौ ज्योती चव्हाण ,सौ सुमनबाई रोडे, रेखा बाई मढवई, उज्वल मढवई, वनिता जाधव यांच्यासह पाणी वाटप सहकारी संस्थांचे अध्यक्ष व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने