सेनापती तात्या टोपे संचलित एन्झोकेम विद्यालयात गणरायाचे उत्साहात आगमन
सेनापती तात्या टोपे संचलित एन्झोकेम विद्यालयात गणरायाचे उत्साहात आगमन 

 

येवला : प्रतिनिधी

सामाजिक प्रबोधनाचा भाग म्हणून गणेश प्रतिष्ठापना हा सामाजिक प्रबोधनाचा विषय व व्यासपीठ व्हावे म्हणून भव्य मिरवणुकीने वाजतगाजत सेनापती तात्या टोपे शिक्षण प्रसारक मंडळाच्या एन्झोकेम विद्यालयाने सामाजिक परंपरेला फाटा देत व स्त्री-पुरूष समानता अंमलात आणत गणरायाचे आगमन व प्रतिष्ठापना मुलींच्या हस्ते करत एक नवीन पायंडा एन्झोकेम विद्यालयाने पाडला. विद्यालयाच्या गणरायाचे सालाबादप्रमाणे या वर्षीही शहरातून वाजतगाजत मिरवणूकीद्वारे आगमन झाले. मिरवणुकीत सर्वात पुढे असलेल्या विद्यालयाच्या झांज पथक व लेझीम पथकाने शहरवासीयांसाची मने जिंकून घेतली. त्यानंतर कलशधारी मुलींचे पथक होते. शहरातील प्रमुख चौकांत झांज पथक व लेझीम पथकांनी नेत्रदीपक कला सादर करून सर्वांचीच मने जिंकली. चेतन बेलदारओम क्षीरसागररुद्र क्षीरसागरसाक्षी लोणारीविद्यालयाचे प्राचार्य दत्ता महालेपुरुषोत्तम रहाणे यांनी लाठीकाठी व दांडपट्टा फिरविण्याच्या चित्तथरारक कसरती सादर केल्या. मिरवणुकीत भगवान शंकरपार्वती व गणरायाची वेशभूषा केलेल्या अनुक्रमे ऋतुजा तनपुरेस्वरदा वानरे व हरिश आहेर या विद्यार्थ्यांचा चित्ररथही होता. विद्यालयात  कर्मचारी मच्छिंद्र नाईकवाडे व त्यांच्या पत्नी शारदा नाईकवाडे, सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत खंदारे तसेच विद्यालयाच्या विद्यार्थीनी यांच्या हस्ते गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. कार्यक्रमाचे नियोजन उत्सवप्रमुख दत्ता उटवाळे, प्रसेन पटेल, प्राचार्य दत्ता महाले, उपप्राचार्य संजय बिरारीपर्यवेक्षक किशोर जगतापमाधवराव गायकवाडराजेंद्र गायकवाड यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी वीणा परातेसरस्वती नागपुरेआसावरी जोशीचंपा रणदिवेप्रसेन पटेलरिजवान शेखमहेश कांबळेरमेश माळीप्रकाश सोनवणेसारिका चौधरीरंजना चौधरीप्रेरणा जोशीकैलास चौधरीपुष्पा कांबळेसुरेखा राजपूतसुभाष नागरेराम पटेलसतिश विसपुतेअशोक सोनवणेअनिल पगारेभास्कर लहरेविजय मोकळसंदीप खोजे, कैलास धनवटे, कैलास पाटील, अविनाश कुलकर्णी, सुनिल कोटमे यांनी विशेष परिश्रम घेतले. पौरोहित्य बापू कुलकर्णी यांनी केले.  

थोडे नवीन जरा जुने