अंगणगाव येथे राज्य पुरस्कार प्राप्त कुऱ्हाडे यांचा सत्कारअंगणगाव येथे राज्य पुरस्कार प्राप्त कुऱ्हाडे यांचा सत्कार

 

येवला - प्रतिनिधी

अंगणगाव केंद्र शाळा व जनता बँक यांच्या संयुक्त विद्यमाने राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त नानासाहेब कुऱ्हाडे यांचा व सकाळ चे बातमीदार व सानेगुरुजी वाचनालय चिचोडी चे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रमोद पाटील यांचा सहकार नेते अंबादास बनकर, सरपंच विठ्ठलराव आठशेरेयांच्या शुभ हस्ते सन्मानचिन्ह, शाल,श्रीफळ, गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.शाळेत विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव  मिळण्यासाठी शिक्षकांनी विविध स्पर्धांचे आयोजन केले होते.सत्कारासोबत बक्षीस वितरण करतांना बनकर यांनी भरभरून विद्यार्थी व शिक्षक यांचे कौतुक करतांना अंगणगाव शाळेला पिण्याच्या  पाण्याची टाकी,पाणी शुद्धीकरणासाठीचा पूर्ण प्लांट, ग्रामपंचायतीच्या वतीने पूर्णवेळ  मोफत पाणी पुरवठा, गरज पडल्यास मोठा लोकसहभाग देण्याचे कबूल केले. सत्काराला श्री कुऱ्हाडे व श्री पाटील यांनी उत्तर दिले, मराठी शाळा टिकविण्यासाठी शिक्षकांनी मेहनत घ्यावी असा सल्लाही यावेळी देण्यात आला,शाळेला भौतिक सुविधा उभारण्यासाठी कोणतीही मदत करण्याचे कबुल केले, यावेळीअंगणगाव शाळेतील उपक्रमशिल शिक्षक गोकूळ वाघ यांचे संकल्पनेतून शाडूच्या मातीपासून गणपती कार्यशाळा आयोजित करून पर्यावरण पूरक गणपती तयार करून त्याच गणपतीची स्थापणा शाळेत करण्यात आली.गणपती उत्सवानिमित्त  शाळेत  लिंबू चमचा,संगित खुर्ची,पोते उड्या,100 मिटर धावणे,सुंदर हस्ताक्षर स्पर्धा चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या .प्रस्तावना गोकूळ वाघ व अंबादास सापनर यांनी केली तर आभार प्रदर्शन  दिनकर शिरसाठ यांनी मानले. सदर कार्यक्रमासाठी सुरेश परदेशी,भरत गायकवाड, शालेय व्यवस्थापण समिती सदस्या सविता कुलथे दिनकर शिरसाठ गोकूळ वाघ अंबादास सापणर ,संगिता वाघ, पूनम दुकळे  राजापूर येथील सैनिक श्री वाघ उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने