मुग, उडीद, सोयाबीन विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी करा - आव्हाड येवल्यात किमान आधारभूत किंमत योजनेसाठी शेतकऱ्यांना आवाहनमुग, उडीद, सोयाबीन विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी करा - आव्हाड 

येवल्यात किमान आधारभूत किंमत योजनेसाठी शेतकऱ्यांना आवाहन

 


येवला  : प्रतिनिधी

 खरीप हंगामामध्ये राज्यात किमान आधारभूत किंमत योजनेतंर्गत नाफेडच्या वतीने मुग, उडीद व सोयाबीनची खरेदी करण्यात येणार आहे.खरेदीसाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक असून नोंदणीची कार्यवाही २५ सप्टेंबर पासून सुरु करण्यात आली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी नोंदणी करावी,असे आवाहन येथील खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष दिनेश आव्हाड,व्यवस्थापक बाबा जाधव यांनी केले आहे.

येथील खरेदी विक्री संघात शासकीय दराने खरेदी होणार आहे.यावर्षी मुगाला आधारभूत दर ६ हजार ९७५ तर उडीदाला ५ हजार ६०० रुपये दर मिळणार असून नोंदणी कालावधी ९ ऑक्टोबर पर्यत आहे. सोयाबीनचा आधारभूत दर ३ हजार ३९९ असून नोंदणी कालावधी १ ते ३१ ऑक्टोबर पर्यत आहे.सर्व खरेदी ऑनलाईन पध्दतीने होणार आहे. शेतकऱ्यांनी ज्या तालुक्यात त्यांची जमीन आहे, त्याच तालुक्यातील खरेदी केद्रांवर ऑनलाईन नोंदणी करावी. नोंदणीचा प्रारंभिक कालावधी १५ दिवसांचा असेल.तसेच अपवादात्मक प्रकरणी त्यानंतर आलेल्या शेतकऱ्यांच्या अर्जाची नोंदणी खरेदी सुरु झाल्याच्या पहिल्या १५ दिवसांत करण्यात येईल.

नोंदणीकरीता आधार कार्डची प्रत व मुग,उडीद,सोयाबीन या पिकांची नोंद असलेला सातबारा उतारा द्यायचा आहे. शेतकऱ्याचा कार्यरत असलेला मोबाईल नंबर खरेदी केंद्रावर दयावयाचा आहे.नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना नोंदणीच्या क्रमवारीनुसार माल आणण्यासाठी एसएमएस व्दारे कळविण्यात येईल शेतकऱ्यांनी ज्या केंद्रावर नोंदणी केलेली आहे, त्याच केंद्रावर माल आणवयाचा आहे.शेतकऱ्यांनी एफएक्यु दर्जाचा माल म्हणजेच काडीकचरा नसलेला, चाळणी करुन व सुकवून १२ टक्के ६ पेक्षा जास्त आद्रता नसलेला माल विक्रीला आणावा.

शेतकऱ्यांना शेतमालाची रक्कम त्यांच्या आधार कार्डाशी संलग्न बँक खात्याव्दारेच देण्यात येईल, त्यामुळे आपले बँक खाते आधार कार्डाशी संलग्न असल्याची त्यांनी खात्री करावी.व्यापाऱ्याच्या तुलनेत संघात शासकीय दर मिळणार असल्याने सर्व शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष दिनेश आव्हाड,उपाध्यक्ष भागुजी महाले,

व्यवस्थापक बाबा जाधव व संचालक मंडळाने केले आहे.थोडे नवीन जरा जुने