टीव्ही व चित्रपटाच्या काल्पनिक विश्वात जगू नका - नानासाहेब नागदरे.
येवला : प्रतिनिधी
अंत हे आरंभ हे नारी तू नारायणी ! अगदी पुरातन काळापासून भारतीय संस्कृतीमध्ये स्त्री ला फार महत्वाचे स्थान आहे स्त्री हि ख-या अर्थाने पुरुषांच्या जीवनाला अर्थ प्राप्त करून देत असते पण इतके सर्व असूनही काही विकृत मानसिकता असलेले लोक, पाशात्य संस्कृतीचे अंधानुकरण, इंटरनेटचा वाढता अतिवापर, मोडकळीस आलेली एकत्रित कुटुंब व्यवस्था,संस्काराचा अभाव यासारख्या नानाविध कारणास्तव अगदी निरागस चिमुकल्या बालिकापासून ते अगदी वयोवृद्ध स्त्रीयांवर मानसिक शारीरिक तसेच लैगिक अत्याचाराच्या घटनात झपाट्याने वाढ होताना दिसत आहे.भारत हा शांतताप्रिय तसेच कायद्यावर विश्वास ठेवणारा देश आहे, याविविध अत्याचारापासून संरक्षण होण्याच्या दृष्टीने विविध कायदे अस्तित्वात आलेले आहे. विविध संरक्षणात्मक यंत्रणा (पोलीस मित्र अँप्स ,जि.पी.एस) या देखील समाजात दाखल झाल्या आहे. त्याचा योग्य वापर मार्गदर्शन कसे मिळवायचे तसेच बदलत्या काळाची पावले ओळखून आजच्या युवतींना स्व स्वरक्षणाच्या दृष्टीने निश्चित व आत्मनिर्भर बनविण्याच्या दृष्टिकोनातून श्री.साईराज शिक्षण प्रतिष्ठान संचालित विश्वलता कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात महिला तक्रार निवारण समितीच्या पुढाकाराने युवतीच्या सुरक्षिततेचा जनजागर या व्याख्यांनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून येवला शहराचे पोलीस प्रमुख मा.नानासाहेब नागदरे त्यांचे सहाय्यक मा.संदीप पाटील, मा.चंद्रकांत निर्मळ तसेच संस्थेचे सचिव श्री.प्रशांतदादा भंडारे, महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.डी.के.कदम,तसेच सर्व शाखांतील महाविद्यालयीन युवती मोठ्या संख्यने उपस्थित होत्या.
सर्वप्रथम सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर आलेल्या अतिथींचे मोठा बडेजाव न करता रोपटे देऊन यथोचित सत्कार करण्यात आला "त्यानंतर मा.नानासाहेब नागदरे यांनी मार्गदर्शन करताना महाविद्यालयीन युवतींना मोलाचा सल्ला देतांना सांगितले की जर आपल्यावर कोणी अन्याय करत असेल तर तो निमूटपणे सहन न करता कणखर होण्याची व अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याची मानसिकता तयार होणे ही आजच्या काळाची गरज असून त्या साठी सर्वांनी पुढे येणे गरजेचे आहे कायदा हा नेहमी आपल्या राक्षणासाठी सज्ज आहे जर आपल्यावर किव्हा आपल्या सोभोवतली काही अत्याचार,छेडछाड ,अनुचित प्रकार आढळून आले तर वेळीच त्या विरुद्ध उभे राहणे आवशयक आहे तसेंच समाज कंटकाकडून, टवाळखोर गटाकडून एखादया मुलाकडून त्रास होत असेल तर त्वरित आपल्या वर्गशिक्षका मार्फत, प्राचार्य मार्फत महिला तक्रार समितीकडे तक्रार देऊन व पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून आपली सोडवणूक करून घेता येईल.मुली बदनामी होण्याच्या कारणास्तव तक्रार करण्यास पुढे येत नाही. त्या भितात पण अन्याय करण्यापेक्षा अन्याय सहन करणार मोठा दोषी असतो. चित्रपटाच्या किंवा मालिकेतील आयुष्य व खरे आयुष्य यात खूप मोठ्या तफावती आहेत त्याचा डोळसपणे विचार व स्वीकार करणे खूप गरजेचे आहे. असे पोलीस निरीक्षक

नानासाहेब नागदरे यांनी सांगितले.