विज्ञान रसायनशास्त्र क्षेत्रात करियरच्या संधी- प्रा.कुलकर्णी यांचे व्याख्यान.
विज्ञान रसायनशास्त्र क्षेत्रात करियरच्या संधी- प्रा.कुलकर्णी यांचे व्याख्यान.
येवला : प्रतिनिधी
     
श्री साईराज शिक्षण प्रतिष्ठान संचालित विश्वलता कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथील विज्ञान विभागाच्या वतीने विज्ञान रसायनशास्त्र क्षेत्रातील करियरच्या विविध संधी या मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.या मार्गदर्शनपर व्याख्यानासाठी व्याख्याते एस.एस.जी.एम वरिष्ठ महाविद्यालय कोपरगाव येथील सेवानिवृत्त सिनिअर प्राध्यापक डॉ.जी.के.कुलकर्णी हे होते. 

सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते व्याख्यातांच्या सत्कार करण्यात आला.त्यानंतर कार्यक्रमाचे सूत्र संचालक् प्रा.ए.पी.बळे यांनी प्रा.कुलकर्णी अल्पसा परिचय करून दिला सरांचे रसायन शास्रावरील प्रेम व प्रभुत्व त्यांच्या व्यक्तिमत्वातून प्रतीत होत होते. 

त्यानंतर व्याख्यानाची सुरुवात कुलकर्णी सरानी करतांना विज्ञान क्षेत्रात अनेक विद्यार्थी खूप चांगल्याप्रकारचे करियर करू शकतात आज जीवघेण्या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यात करियर विषयक संभ्रम निर्माण झाला आहे.काहींनी विज्ञान शाखेत अनुकरण म्हणून प्रवेश घेतला पण पुढें योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे ते देखील सैरभैर फिरताना दिसत आहे. पण निराश होण्याची अजिबात आवश्यकता नाही. कारण विज्ञान शाखेत अनेक संधी उपलब्ध आहेत त्यात फॉरेंसिक विभाग, रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभाग भारत सरकारच्या व राज्यसरकाच्या अंतर्गत येणं-या विविध विज्ञान शाखा आधारित परीक्षा उपक्रम व अस्थापनामध्ये चांगल्या नोकरी तसेच संशोधनात्मक संधी तसेच केमिस्ट,अलोपॅथी,आयुर्वेदिक,युनानी,हेल्थ अँड फूड या विषयांसंबंधी विस्तृत माहिती सरांनी विद्यार्थ्याना पर्यंत पोहचवली परंतु हे सर्व करण्यासाठी कठोर परिश्रम घेण्याचा सतत ध्यास असणे नियमित विज्ञान वृत्तपत्राचे सखोल वाचन,नवनवीन भाषा शिकण्याची वृत्ती असणे,चांगले निरीक्षण व विज्ञान वादी सकारात्मक दृष्टिकोन यासर्व बाबीची आवश्यकता असते.आपली क्षमता, विविध संधी आणि आसपासची परिस्थिती यानुसार योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन घेण्याची समर्पक सूचना करत विद्यार्थ्याना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मा.प्राचार्य कदम हे होते, कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.अक्षय बळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी विभाग प्रमुख प्रा.अर्चना खटकाळे, प्रा.उमेश सोमासे,प्रा.रवींद्र अरसुले यांनी परिश्रम घेतले,तर आभार प्रदर्शन शुभम इंगळे या विद्यार्थ्याने मानले.


 थोडे नवीन जरा जुने