कोटमगाव देवीचे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी सौ,नंदिनी शूळ यांची बिनविरोध निवड
येवला : प्रतिनिधी
कोटमगाव खु ग्रामपंचायतीची निवडणूक 2015 मध्ये झाली होती, शरद लहरे, (मा, चेअरमन नासिक जि दूध संघ)प्रा,नानासाहेब लहरे(भाजपा तालुका सरचिटणीस) भाजपा जेष्ठ नेते बाबासाहेब कोटमे,भाऊसाहेब आदमाने ,लहानु धांद्रे,जनार्दन कोटमे, यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीवर बहुमत प्राप्त केले होते,रोटेशन पद्धतीने उपसरपंच सौ,ज्योती आदमाने यांनी राजीनामा दिला त्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर सौ,नंदिनी शूळ यांची बिनविरोध निवड झाली,या निवडी प्रसंगी बोलतांना शरद लहरे यांनी कोटमगाव ग्रामपंचायतीने जिल्ह्यात विकासाच्या बाबतीत जी भरारी घेतली आहे ती कायमस्वरूपी राहील यासाठी प्रयत्न करू,प्रा,नानासाहेब लहरे यांनी आपल्या मनोगतात गावाच्या विकास कामासाठी अनेक योजना मार्गी लावल्या आहेत तसेच अजून योजना कश्या मार्गी लावता येईल यासाठी प्रयत्न करू,नवनिर्वाचित उपसरपंच नंदिनी शूळ यांनी आपल्या मनोगतात सर्वांना सोबत घेऊन गावाचा विकास करू,या निवडी प्रसंगी सरपंच नामदेव माळी, सदस्य दत्तात्रय कोटमे, ज्योती आदमाने,योगिता लहरे,यांसह सुभाष कोटमे,रावसाहेब आदमाने,नवनाथ कोटमे,भारत मगर,अजय मगर,प्रमोद लहरे,प्रवीण लहरे,तुकाराम पवार,भीमराज चव्हाण,आशा कोटमे,सुमनबाई कुऱ्हाडे,भगवान लहरे,रोहित मढवाई,अशोक मोरे,विकास लहरे,रवींद्र सोनवणे,नवनाथ शूळ,ग्रामसेवक सचिन कल्हापुरे,ग्रामपंचायत कर्मचारी इमाम कादरी,यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते,