एरंडगाव येथे ई लर्निंग वर्गाचे उद्घाटन


एरंडगाव येथे ई लर्निंग वर्गाचे उद्घाटन

येवला : प्रतिनिधी

एरंडगाव  येथील स्वामी विवेकानंद विद्यालय येथे पालक मेळावा प्रसंगी प पु साने गुरूजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने सहा डीजीटल ई लर्नींग वर्गाचे उदघाटन सरपंच संघटनेचे सोशल मिडीया प्रमुख तथा साताळीचे सरपंच भाऊसाहेब कळसकर यांचे हस्ते करण्यात आले 
  सरपंच भाऊसाहेब कळसकर हे शाळेचे माजी विद्यार्थी असल्याने शाळेने डीजीटल युगात प्रगतीचे एक पाऊल पुढे टाकले आहे जुन्या आठवणी सांगत शाळेने दिलेले संस्कार व जिवन जगण्याची कला पाठीशी कायम राहील असे अनुभव सांगत सुसिक्षीत असी पीढी घडविणे हेच खरे सामाजिक कार्य आहे असे उदगार त्यांनी आपल्या भाषणातुन  काढले 
यावेली आलेल्या सर्व पाहुण्यांचा शाळेच्यावतीने शाल व श्रीफळ देऊ सत्कार करण्यात आला
  तसेच शिक्षक बाराहाते सर वाघ सर ,रोहोम सर,मेहत्रे सर,क-हे सर यांनी मुलांना ई लर्नींग व डीजीटल वर्गाची माहीती दिली
यावेळी एरंडगावच्या सरपंच रत्ना पिंगट, विद्यालयाचे प्राचार्य रामदास भड,संस्थेचे संचालक बिपीन ज्ञाने सर, व शिक्षक वृंद व ग्रामस्थ उपस्थीत होते
बाराहाते सर यांनी सुत्रसंचालन केले तर
शिक्षीका मंदा रोहोम यांनी आभार मानले
थोडे नवीन जरा जुने