राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ६६ प्रकरणे निकाली



राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ६६ प्रकरणे निकाली 

येवला: प्रतिनिधी
 येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयत शनिवार, ता. ८ रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते.  त्यात येवला न्यायालयातील ६६ प्रकरणे निकाली होऊन १ लाख १५ हजार ८०० रुपयांची वसुली झाली.  तसेच सर्व राष्ट्रीयकृत बँकांची मिळून  ६ प्रकरणे निकाली होऊन त्यात १३ हजार ३०० रुपयांची वसुली झाली तर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीची मिळून ३६४ प्रकरणे निकाली होऊन ३ लाख ४ हजार ९२३ रुपयांचा कर वसुली झाला.
सदर लोकन्यायालय यशस्वीततेसाठी न्यायााधिश
ए.एम. ताम्हणे, सहन्यायाधिश एन.एन. चिंतामणी, वकील संघाचे अध्यक्ष पी.एम. गायकवाड, तसेच येवला न्यायालयातील सर्व विधिज्ञ, गटविकास अधिकारी सुनिल आहिरे, सहायक गटविकास अधिकारी शेख, विस्तार अधिकारी आहिरे, शहर व तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी, राष्ट्रीयकृत बँकांचे शाखाधिकारी, कर्मचारी यांचेसह येवला न्यायालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने