संचालकांच्या मालमत्ता विकून एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीच्या ठेवी परत द्या सभापती रामराजे निंबाळकर यांचे आदेश,नाशिकच्या श्रीराम सहकारी बँकेला वर्षाची मुदत
संचालकांच्या मालमत्ता विकून  एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीच्या  ठेवी परत द्या 

सभापती रामराजे निंबाळकर यांचे आदेश,नाशिकच्या श्रीराम सहकारी बँकेला वर्षाची मुदत

 

येवला : प्रतिनिधी

सातपूर येथील मायको एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीच्या सात कोटी दोन लाखाच्या ठेवी एक वर्षात परत करण्यात (देण्यात) याव्या त्यासाठी श्रीराम बँकेच्या तात्कालिन संचालकांच्या मालमत्ता विका असे अधिकार्य्याना आदेश विधानपरीषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी दिले.

नाशिकच्या श्रीराम सहकारी बँकेत मायको सोसायटीच्या अडकलेल्या आहेत. हि रक्कम मिळवण्यासाठी मायको सोसायटिचे संचालक मंडळ वारंवार प्रयत्न करत आहे.बॉश एम्प्लॉईज युनीयनचे खजिनदार माणिकराव बोडके यांच्या पुढाकाराने विधिमंडळाच्या नागपूर येथील पावसाळी अधिवेशनात संचालक मंडळाने आमदार नरेंद्र दराडे,आमदार किशोर दराडे यांच्या नेतृत्वाखाली सहकारमंत्री सुभाषजी देशमुख,विधानपरिषदेचे सभापती निंबाळकर,पालकमंत्री गिरीष महाजन,शिवसेना गटनेत्या निलम गोह्रे यांची भेट घेवून ठेवी परत मिळवून देण्याची विनंती केली.गोह्रे यांनी विधानपरिषदेमध्ये औचित्याच्या मुद्यांच्या आधारे प्रश्न उपस्थित केला होता.

त्यानुसार सभापती निंबाळकर यांनी आपल्या दालनात आमदार नरेद्र दराडे यांच्या उपस्थितीत यासंदर्भात बैठक घेतली.सहकार विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला,उपसचिव डॉ. सुदिन गायकवाड,नाशिकचे विभागीय सहनिबंधक मिलिंद भालेराव,जिल्हा विशेष लेखापरीक्षक डी.एन.काळे, सहकार आयुक्त कार्यालयातील उपनिबंधक सोपान शिंन्दे, जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने,नाशिकच्या उपनिबंधक डॉ.सौ.प्रिया दळनर,श्रीराम बँकेचे व्यवस्थापक एस.एच. जवळेकर आदि उपस्थित होते.

आमदार दराडे साहेब,बोडके, मायको सोसायटिचे संचालक मंडळांने मायको सोसायटिची बाजू मांडताना, श्रीराम सहकारी बँकेत अडकलेल्या ठेवींमुळे संस्था व सभासदांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.सभासदांच्या मुला-मुलींच्या विवाहासाठी, शिक्षणासाठी, आजारपणावरील उपचारासाठी पैशांची अडचण येत आहे.सर्वांचे म्हणणे ऐकूण घेतल्यावर निंबाळकर यांनी ठेवी परत देण्याचे आदेश दिले आहेत.  

Yeola 7_3,4

मुंबई : मायकोच्या ठेवी परत देण्यासंदर्भात झालेल्या बैठकीला उपस्थित असलेले विधानपरीषदेचे सभापती रामराजे निंबाळकर,आमदार नरेद्र दराडे आदि  
 
 

थोडे नवीन जरा जुने