येवला मर्चंट बँकेच्या संचालकांनी आत्मपरिक्षण करावे संचालक व ठेवीदारांनी पुढे येण्याचे काबरा यांचे आवाहन
येवला मर्चंट बँकेच्या संचालकांनी आत्मपरिक्षण करावे

संचालक व ठेवीदारांनी पुढे येण्याचे काबरा यांचे आवाहन

 

येवला - प्रतिनिधी

येथील अग्रगण्य व्यापारी बँक असलेल्या येवला मर्चंट बँकेच्या संचालकांची सहकार खात्याकडून सुरू असलेली चौकशी व आलेल्या नोटीसा याविषयी त्यांनी खुलासा करावा म्हणजे संभ्रम दूर होईल अशी मागणी ज्येष्ठ सभासद व माजी नगरसेवक नितीन काबरा यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

बँकेची आर्थिक परिस्थिती भक्कम असून सभासदांनी व ठेवीदारांनी बँकेसाठी पुढे यावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

मर्चंट बँकेविषयी ठेवीदारांमध्ये वेगळ्या - वेगळ्या अफवा पसरल्या आहेत.या संदर्भात काही संचालकांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला आहे असला तरी जवाबदार संचालक या पत्रकार परिषदेला गैरहजर का होते? , किंबहुना बँक सक्षम असल्याचे सांगण्याची वेळ संचालक मंडळावर का आली याचेही आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. कारण वर्षांपूर्वी संचालक मंडळाला कलम ८३-१ व ८८-१ नुसार सहकार विभागाने नोटिसा बजावल्या आहेत. त्यानंतर अनेकदा संचालकांची चौकशी देखील सहकार विभागाने केलेली आहे.कारणे दाखवा नोटीस देऊन संचालक मंडळाला बरखास्तीसंदर्भात विचारणा देखील केली असल्याची चर्चा आहे याविषयीही संचालकांनी बोलावे व सभासदांचा गैरसमज दूर करावा अशी भूमिकाही काबरा यांनी मांडली.

बँकेच्या कारभारासंदर्भात कोणी तक्रारी केल्या ,तक्रारीची वेळ का आली,कारभारी कारभार कसा करत होते असे अनेक प्रश्न शहरवासियांना पडलेले आहेत.गाडीचा सारथी योग्य नसला की गाडी खड्ड्यात जाणारच असेच काहीसे बँकेच्या बाबतीत झाले आहे. अजूनही सर्व काही हातात आहे त्यामुळे योग्य सारथी सोबत घेऊन संचालक व जेष्ठ सभासदांनी बँके विषयीचे ठेवीदारांचे गैरसमज दूर करावेत. संचालकांना आलेल्या नोटीसा आणि बँक यांचा काहीही संबंध नसल्याची जाणीव करून द्यावी.७५ वर्ष शहराचा आर्थिक कणा असलेल्या बँकेला स्थूस्थितीत आणण्यासाठी सक्षम नेते व व्यापाऱ्यांनी पुढे यावे असे आवाहन काबरा यांनी केले आहे.आता संचालकावर विश्वास नसला तरी नेते व व्यापाऱ्यांवर येवलेकर नक्की विश्वास ठेवतील असे आवाहन त्यांनी केले आहे.

थोडे नवीन जरा जुने