येवला लासलगाव विधानसभा मतदार संघाच्या युवक काँग्रेसच्या विधानसभा अध्यक्षपदी मंगलसिंग परदेशी यांची बिनविरोध निवड



येवला लासलगाव विधानसभा मतदार संघाच्या युवक काँग्रेसच्या विधानसभा अध्यक्षपदी मंगलसिंग परदेशी यांची बिनविरोध निवड 
 
येवला : प्रतिनिधी
येवला लासलगाव विधानसभा मतदार संघाच्या युवक काँग्रेसच्या विधानसभा अध्यक्षपदी युवा नेते मंगलसिंग परदेशी यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीने मतदार संघातील  युवकामध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील युवकांनी मोठा जल्लोष केला.
कॉग्रेसचे अध्यक्ष खा.राहुल गांधी यांनी युवकांना लोकशाहीत व पक्षसंघटनेत अधिकाधिक सक्रिय होण्यासाठी प्रत्येक ठिकाणी युवक काँग्रेसची निवडणूक घेतली. यामध्ये येवला लासलगाव मतदार संघाच्या युवक कॉंग्रेस विधानसभा निवडणुकीत मंगलसिंग परदेशी यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी परदेशी यांचा तालुक्यातील कॉंग्रेस कमिटीच्या वतीने प्रांतिक सदस्य एकनाथ गायकवाड व शहराध्यक्ष राजेश भंडारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते अरुण आहेर, शिक्षक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष विजय कदम, संदीप मोरे, नानासाहेब शिंदे, नवनाथ भोसले, बाबासाहेब मढवई, मुकेश पाटोदकर, रामदास पवार, सोपान खापरे, उस्मान शेख, बापू साताळकर, शिवाजी धनगे, रावसाहेब लासुरे, सोनू सपकाळ, पिंटू परदेशी, सोनू परदेशी, राहुल शिंदे, आदि सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 
=================================================
फोटो कॅप्शन - मंगलसिंग परदेशी यांचा सत्कार करताना एकनाथ गायकवाड, राजेश भंडारी समवेत अरुण आहेर, विजय कदम, संदीप मोरे, नानासाहेब शिंदे, आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते 



थोडे नवीन जरा जुने