"राधिका इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा"
येवला : प्रतिनिधी
राधिका शैक्षणिक संस्था संचलित ,राधिका इंटरनॅशनल स्कूल , येवला शाळेत दि.५ सप्टेंबर २०१८ रोजी डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस अर्थात शिक्षकदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
शाळेतील प्राथमिक इयत्तेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी एक दिवसासाठी का असेना आपल्या शिक्षकांच्या भुमिका साकारल्या व त्या यशस्वीरित्या पार देखिल पाडल्या. राधिका संस्थेचे खजिनदार मा.श्री काशिनाथ धुमाळ, शाळेचे प्राचार्य मा.श्री सुनीलकुमार यांचेहस्ते आदरणीय डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर मा. प्राचार्य सरांनी आदरणीय डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याविषयी माहीती देवुन आपल्या भाषणातून सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा परीचय करुन दिला.शाळेतील विद्यार्थ्यांनी देखिल भाषणे केली. शिक्षकांविषयी आदर ठेवुन विद्यार्थ्यांनी शिक्षकगौरव गित सादर केले. कु. सायली जुजगर व कु.उन्नती चव्हाण या विद्यार्थीनींनी कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले. आजच्या दिवशी शाळेत संगितखुर्चीचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा विद्यार्थ्यांमार्फत सत्कार करण्यात आला. शाळेतील सर्व विद्यार्थी व कर्मचारी यांना मिठाई व अल्पोपहार देवुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.