एन्झोकेम विद्यालयात विद्यार्थ्यांनी साजरा केला शिक्षकदिन
एन्झोकेम विद्यालयात विद्यार्थ्यांनी साजरा केला शिक्षकदिन 

येवला : प्रतिनिधी
येथील सेनापती तात्या टोपे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एन्झोकेम विद्यालयात विद्यार्थी शिक्षकांनी अध्यापनाचे कार्य करून शिक्षक दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थी मुख्याध्यापक प्रतीक धनवटेच्या हस्ते डॉ.राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. विद्यार्थी शिक्षक शिक्षिका  श्रुती वारुळे, श्रुती वाबळे, सिद्धेश वाघ, श्रीहरी पाखले, प्रियंका जाधव, प्रणाली वाघ, प्रतीक धनवटे,  यांनी तसेच विद्यालयाचे प्राचार्य दत्ता महाले,  विद्यालयाच्या शिक्षिका वनिता वाघ यांनी आपल्या मनोगतातून शिक्षकाचे आपल्या जीवनातील महत्त्व विशद केले.  त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांचा सन्मान करून त्यांच्याप्रती आदर व्यक्त केला.   प्रसाद साळुंके, प्रतिक्षा जगझाप, अवंतिका दोडे, सुयोग तक्ते, यश गाडेकर, प्रांजल पटेल, प्रेम इसमपल्ली इत्यादी विद्यार्थ्यांनी अध्यापन कार्यात सहभाग घेतला. कार्यक्रमाचे नियोजन उत्सवप्रमुख दत्ता उटवाळे यांनी तर सूत्रसंचालन प्रांजल कहार व तेजल सोनवणे यांनी केले. आभार तेजस जानराव याने मानले. कार्यक्रमास विद्यालयाचे उपप्राचार्य संजय बिरारी, पर्यवेक्षक किशोर जगताप, राजेंद्र गायकवाड, उत्तम पुंड, पुष्पा आहेर, चंपा रणदिवे, प्रकाश सोनवणे, अविनाश कुलकर्णी, विजय साळुंके, कैलास पाटील, माधवराव गायकवाड व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
=======================
फोटो कॅप्शन 
एन्झोकेम विद्यालयात विद्यार्थ्यांनी  शिक्षकदिन साजरा केला प्रसंगी विद्यार्थी शिक्षक 
 

 

थोडे नवीन जरा जुने