स्वच्छतेच्या माध्यमातून ममदापुर च्या जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांचे महात्मा गांधी यांना अभिवादन
येवला : प्रतिनिधी
ममदापुर मधील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळेच्या आवाराची ,शनि मंदिर परिसराची आज सोमवारी दिनांक ०२ ऑटोम्बर रोजी सकाळी ८.३० वाजता स्वच्छता मोहीम राबवून महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली. या मोहिमेत जवळपास दोन रिक्षा कचरा गोळा करण्यात आला. या स्वच्छता मोहिमेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे असंख्य विद्यार्थी आणि त्यांचे पालक , सामाजिक कार्यकर्ते स्वयंस्फूर्ती ने सहभागी झाले होते यामध्ये लहान बालकांचा सहभाग लक्षणीय होता.
शाळेच्या वतीने स्वच्छतेसाठी आवश्यक असणारे सर्वच साहित्य देण्यात आले होते. यावेळी संपूर्ण परिसराची स्वच्छता करण्यात आली.
मोहिमेची सुरुवात शांतीगीताने करण्यात आली तसेच स्वच्छता अभियान नंतर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती मोठया उत्साहात साजरा करण्यात आली
दांडी यात्रा,स्वदेशी, चले जाव, सत्याग्रह या द्रारे लाखो-करोडो भारतीय लोकांना इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करणारे आणि स्वच्छतेचा संदेश देणारे म्हणून गांधीजी राष्ट्रपिता ठरले असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते दिनेश राऊत यांनी केले तसेच शाळेचे विद्यार्थी समाधान बत्तासे, शुभम शिरसाठ, तेजल केरे आदींनी महात्मा गांधी विषयी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सत्रुसंचलन प्रवीण काकडे सर यांनी केले तर स्वच्छता अभियान आणि महात्मा गांधी जयंती मध्ये स्वयंस्कुर्ती ने सहभागी झाल्या बद्दल खैरनार मॅडम यांनी आभार मांडून राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता केली, सामाजिक कार्यकर्ते दिनेश राऊत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.या उपक्रमात ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब काळे,कैलास बैरागी,किरण गुडघे,शंकर उगले, रमेश गुडघे,शंकर जानराव,जनार्धन उगले,आदींसह परिसरातील नागरिक आणि विद्यार्थ्यांचे पालक बहुसंख्यने सहभागी झाले होते.