शिवसेनेचा उधळलेला वारूकुणीही रोखु शकत नाही:- जिल्हा प्रमुख पाटील.

शिवसेनेचा उधळलेला वारूकुणीही रोखु शकत नाही:- जिल्हा प्रमुख पाटील.

येवला प्रतिनिधी:

शिवसेना पक्ष संध्या जिल्ह्यात व दिंडोरी लोकसभा मतदार संघात सर्वात बलशाली पक्ष  असुन प्रत्येक संस्थामधे शिवसेनेची सत्ता  आहे,येणार्या २०१९ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा उधळलेला वारू कुणीही रोखु शकत नाही असे प्रतिपादन शिवसेनेचे नवनियुक्त जिल्हा प्रमुख सुनिल पाटील यानी केले.येथील कृषी उत्पन्न बाजार समिती हाॅल मध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते .व्यासपीठावरती आमदार नरेद्र दराडे,संभाजी पवार,जिल्हा समन्यवय कुणाल दराडे,महिला आघाडीच्या जिल्हा पद अधिकारी  भारती जाधव,उपजिल्हा प्रमुख निलेश पाटील,उपजिल्हा प्रमुख भास्कर कोंढरे, शिवसेना तालुकाप्रमुख रतन बोरणारे  शहर प्रमुख राजेद्र लोणारी,सभापती न्रमता जगताप, उपनगराध्यक्ष सुरज पटणी आदी उपस्थित होते. छोटी मोठी निवडणूक सुध्दा मोठ्या निवडणुकीची रंगीत तालीम असते व मोठ्या निवडणूकामध्ये जीव झोकून काम केल्यास यश आपलेच आहे असे मत जिल्हाप्रमुख  पाटील यानी व्यक्त केले.या प्रसंगी आमदार नरेद्रजी दराडे संभाजीराजे पवार उपजिल्हाप्रमुख भास्कर कोंढरे  तालुकाप्रमुख रतन बोरणारे वाल्मिकराव गोरे निलेश पाटील व कुनालभाउ दराडे यांनी मनोगत व्यक्त केले.
        
५ ऑक्टोबर रोजी तहसील वरती मोर्चा.


त्यानंतर तालुका निहाय शिवसेनेच्या वतीने होणार्या भव्य मोर्चाचे नियोजन करण्यात आले.दि ५ ऑक्टोबर रोजी महागाई ,इंधनदरवाडीच्या निषेधार्थ भव्य मोर्चा शिवसेना काढणार असुन,हजारो लोक यात सहभागी व्हा असे अहवान यावेळी मान्यवरांनी केले.कार्यक्रमात दरम्यान नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख सुनिल पाटील,जिल्हा समन्यवय कुनालभाउ दराडे उपजिल्हा प्रमुख निलेश पाटील भारती जाधव आदीचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी शिरसगाव लौकी गुप ग्रामपंचायत नवनिर्वाचित जनतेतुन निवडुण आलेले संरपच व ग्रामपंचायत सदस्य याचा सत्कार तसेच पाटोदा येथील कैलास मेंगाने यानी जिल्हा प्रमुख याच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.याप्रसगी पंचायत समिती सभापती नम्रता जगताप खरेदी विक्री संघ चेरमन दिनेश आव्हाड झुझारराव देशमुख नगरसेवक झामभाउ जावळे उपशहरप्रमुख महेश सरोदे दिपक भदाणे राहुल लोणारी धिरज परदेशी युवासेना तालुकाप्रमुख प्रजव्ल पटेल युवासेना शहरप्रमुख लक्ष्मण गवळी रामनाथ जमधडे पुडंलिक पाचपुते कैलास घोरपडे दिलीप मेगाळ श्याम गुंड क्रातीलाल साळवे विठ्ठल महाले छगन आहेर गणेश पेढारी महिला आघाडीच्या साधना घोरपडे नगरसेविका सरोजनी वखारे भागिनाथ थोरात मंकरद तक्ते बापु गायकवाड संतोष गोरे जनार्धन भवर सोमनाथ बुटे दिपक जगताप दिलीप बोरणारे आनंता आहेर जुबैर सौदागर पंकज नळे अन्वर घासी गोरख आहीरे आदी उपस्थित होते. 
सुञसंचालन चंद्रकात शिदे तर प्रास्तविक व आभार प्रमोद तक्ते यानी केले.
थोडे नवीन जरा जुने