येवल्यात जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने रक्तदान शिबीर................


येवल्यात जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने  रक्तदान शिबीर
 
येवला : प्रतिनिधी
 
जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने येवला येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हे रक्तदान शिबीर आयोजित केले होते . या शिबिरास नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला . 
       रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्याने जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या वतीने हे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.  अनंत विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिबिराची सुरूवात करण्यात आली. येवला नगरअध्यक्ष बंडू क्षिरसागर यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.  यावेळी डॉ. कुलकर्णी, नाशिक जिल्हा सरचिटणीस( भाजपा ) प्रमोद सस्कर,  माजी नगरअध्यक्ष प्रदीप सोनवणे, डॉ. कौशिक आदी मान्यवर उपस्थित होते. 
         महाराष्ट्र सिकलसेल अनेमिया, हिमोफिलिया , थॅलॅसेमिया , ब्लड कॅन्सर, किडनी फेल्युअर पेशंट जास्त आढळतात. अशा रूग्णांना वारंवार रक्ताची नितांत गरज असते . यासाठी अनंत विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेने महाराष्ट्र शासनाच्या रक्तपेढ्यांना रक्तबाटल्या देण्याचे श्री संप्रदायामार्फत निश्चित केले होते . संप्रदायाच्या आवाहनाला  प्रतिसाद देत १०१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.  रक्ताचे संकलन.  सिव्हिल ब्लड बँकेच्या सहकार्याने करण्यात आले. 
     रक्तदान हे  सर्वसामान्य व्यक्तीसाठी फक्त दान आहे मात्र गरजूंसाठी ते जीवदान आहे . त्यामुळे या महान कार्यात प्रत्येकाने सहभागी होऊन रक्तदान केल्याने   जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या नाशिक जिल्हा सेवा समिती तसेच ब्लड इन नीड टीमच्या  वतीने रक्तदात्यांचे फूल देऊन आभार मानण्यात आले  करण्यात आले आहे.
     शिबिराच्या वेळी येवला तालुका कमिटी, संतसंग कमिटी, आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
 
 

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने