आंबेडकरी साहित्य अकादमीच्या नाशिक शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न

आंबेडकरी साहित्य अकादमीच्या नाशिक शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न

येवला- प्रतिनिधी

मानवतावादी मूलयांची जपणूक करण्यासाठी व सर्वच क्षेत्रात न्याय, समता,स्वातंत्र्य या संविधानिक मूल्यांची जपणूक व्हावी,अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित राहावे या उद्देशाने आंबेडकरी साहित्य अकादमीची स्थापना शाहू महाराज शिक्षणसंस्थेच्या संचालक तथा प्राचार्य डॉ.विजयालक्ष्मी वानखेडे यांनी बुलढाणा येथे केली आहे.याच अकादमीच्या नाशिक शाखेचे उद्घाटन नुकतेच नाशिक येथे पार पडले. आंबेडकरी साहित्य अकादमीच्या केंद्रीय समितीचे पदाधिकारी प्रा.रविराज वानखेडे यांचे हस्ते हा उदघाटन सोहळा पार पडला. यावेळी मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की,संविधानाने दिलेले व्यक्तिस्वातंत्र्य ही अमूल्य देणगी आहे,आपल्या व्यवसायाबरोबर समाजोपयोगी कामे करुन सामाजिक ऋण फेडणे हे प्रत्येकाचे आद्यकर्तव्य असायला हवे.प्रत्येक नवोदितास व्यक्त होण्यासाठी एक मंच असायला हवा जिथे कुठलाच भेदभाव नसेल. साहित्याच्या,समाजकार्याच्या बाबतीतही 'प्रस्थापितांचा सन्मान व नवोदितांना संधी' हे अकादमीचे ब्रीदवाक्य आहे.
याप्रसंगी अकादमीचे मलकापूर येथील पदाधिकारी अरुण पाटील हेही उपस्थित होते.
     नाशिक शाखेच्या अध्यक्षा प्रा.डॉ.प्रतिभा जाधव यांनीही यावेळी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, ग्रामीण भागातील मुलांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुणवत्ता दडलेली असते, त्यांना व्यक्त होण्यासाठी आंबेडकरी साहित्य अकादमी हा हक्काचा मंच आम्ही नवीन दमाचा साहित्यिक,कलावंतासाठी उपलब्ध करून देत आहोत.महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यात या अकादमीच्या शाखा स्थापन झाल्या असून तालुका व गावपातळीपर्यंत हे काम जोमाने सुरू आहे. प्रबोधनाच्या या कार्यात प्रत्येकाने आपला वाटा उचलायला हवा त्यासाठी नाशिक शाखेच्या माध्यमातून कार्यशाळा, व्याख्यानमाला, विविध स्पर्धा, नाट्यप्रयोग इत्यादींचे आयोजन भविष्यात करण्यात येणार असल्याची माहिती डॉ.जाधव यांनी दिली.उपाध्यक्ष सुनील खरे यांनीदेखील अकादमीच्या माध्यमातून नवोदितांना संधी  निर्माण करू व विविध समाजोपयोगी कामे उभी करू याची ग्वाही दिली.
ह्यावेळी रवीराज वानखेडे सरांनी अकादमीचे ध्येय , धोरणे  आणि उद्दिष्टे स्पष्ट केले. याप्रसंगी आंबेडकरी साहित्य अकादमीच्या ध्येय व उद्दिष्टांवर सविस्तर चर्चा झाली व नाशिक शाखेची कार्यकारिणीही जाहीर करण्यात आली त्यात अध्यक्षा -डॉ .प्रतिभा जाधव,उपाध्यक्ष-सुनील खरे,सचिव-मधुकर जाधव,सहसचिव-जावेद शेख,प्रसिद्धीप्रमुख-बापूसाहेब वाघ,कोषाध्यक्ष-संतोष घोडेराव,सल्लागार-प्रा.गंगाधर अहिरे,सदस्य-प्रा.शरद शेजवळ,गोरख घुसळे,निलेश निकम,अक्षय सोनवणे,प्रशांत शिंदे रवीराज गोतिस, सुभाष गांगुर्डे,निलेश पवार हे आहेत.
थोडे नवीन जरा जुने