रोगप्रतिकारक शक्तीवर्धक औषधांची निर्मिती कृषि संशोधनाकडून का केली जात नाही? शेतकरी मेळाव्यात डमाळे यांचा सवाल




रोगप्रतिकारक शक्तीवर्धक औषधांची निर्मिती कृषि संशोधनाकडून का केली जात नाही?
शेतकरी मेळाव्यात डमाळे यांचा सवाल

 येवला : प्रतिनिधी
शेतकर्‍यांना पिकाची मशागत, निगा, औषध फवारणी यावर जास्त वेळ व पैसा वाया जातो. चांगल्या उत्पन्नाच्या बियाणाबरोबरच किडीचा नाश कायमस्वरुपी संपुष्ठात आणण्याकरीता रोगप्रतिकारक शक्तीवर्धक औषधांची निर्मिती कृषि संशोधनांकडून का केली जात नाही, अशी अपेक्षा भाजपाचे प्रांतीक सदस्य बाबा डमाळे यांनी व्यक्त केली.
तालुक्यातील रस्ते सुरेगाव येथे कृषि विभागामार्फत भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे उद्घाटन बाबा डमाळे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छगनबाबा मगर होते. डमाळे पुढे बोलताना म्हणाले की, शेतकर्‍यांचे अनुदाने, बियाणे, औजारे, शासकीय योजनांसह कृषि संशोधनावर शासन कोट्यावधी रुपये खर्च करते. मात्र, शेवटच्या शेतकर्‍यांपर्यंत ह्या योजना पोहचतच नाही. शेतकर्‍यांनी या लाभांच्या भरोशावरची शेती करण्यापेक्षा अत्याधुनिक नव-नविन शेती पिकांची ठिबक पाण्यावर नविन तंत्रज्ञानाचा वापर करुन उच्च प्रतिच्या मालाचे उत्पादन करावे. गरजे नुसार विविध बाजारपेठेत त्याची विक्री करावी, असा सल्लाही यावेळी डमाळे यांनी दिला.
कृषि पर्यवेक्षक भाऊसाहेब काळोखे यांनी यावेळी गुलाबी बोंडअळी एकात्मिक किड नियंत्रण कशी केली जाईल, याची माहिती दिली. जास्त उत्पन्न वाणाच्या शेती प्लाटचे नवनाथ भोंडवे यांनी शेतकर्‍यांनी दाखविले. तर कृषि विभागाने शेतकर्‍यांच्या माती नमुना परिक्षणाचे दाखले शेतकर्‍यांना डमाळे यांच्या हस्ते वितरीत केले. याठिकाणी विविध बि-बियाणे व औषध कंपन्यांनी आपले स्टॉल लावले होते. शेतकर्‍यांनी याप्रसंगी अनेक शेती समस्यांची मांडणी केली. यावेळी कृषि विभागाचे अधिकारी भाऊसाहेब काळोखे, भाऊसाहेब पाटोळे, बाळकृष्ण वारुळे, संजय मोरे, ज्ञानेश्‍वर खाडे, नवनाथ भोंडवे, गोसावी, प्रमोद अगडते, योगेश भड, ज्ञानेश्‍वर सुर्यवंशी आदींनी शेतकर्‍यांंच्या समस्येवर समाधानकारक उत्तरे दिली. यावेळी पोलीस पाटील शब्बीरभाई शेख, नंदू ढमाले, ईश्‍वर सोमासे, अविनाश जगझाप, लक्ष्मणराव रोठे, गोपीनाथ रोठे, लहु पुणे, विलास भागवत, राजाभाऊ ढमाले, बाळासाहेब निकम, दिपक भागवत, नाना शेळके, एकनाथ गायकवाड, बाळासाहेब शेळके, योगेश काळे, बाबासाहेब पगारे, ज्ञानेश्‍वर धुमाळ, प्रदीप ढमाले, शिवनारायण गायके, दगु पवार, प्रविण पवार, अंबादास आहेर, पोपट ढमाले, भास्करराव गोरडे, आप्पासाहेब भागवत, सुधाकर ढमाले, गोरख ढमाले, कचरु शेळके, रामुदादा भागवत, अरुण देवरे, गणेश चव्हाण आदींसह सुरेगाव, गवंडगाव, भुलेगाव, पिंपळखुटे, गारखेडे, डोंगरगाव, देवठाण, खांमगाव, देवळणे, अंगुलगाव आदी गावातील शेतकरी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रगतशील शेतकरी राजेंद्र ढमाले यांनी मानले.



थोडे नवीन जरा जुने