श्रीराम जेष्ठ नागरिक संघाची कार्यकारिणी सभा संपन्नश्रीराम जेष्ठ नागरिक संघाची कार्यकारिणी सभा संपन्न

येवला :  प्रतिनिधी
श्रीराम जेष्ठ नागरिक संघाच्या कार्यकारिणी सदस्यांची सभा संघाचे अध्यक्ष रावसाहेब दाभाडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली
सभेच्या सुरुवातीला तालुक्यातील आ.छगन भुजबळ यांना वाढदिवसाच्या  हार्दिक शुभेच्छाचा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला. तसेच माजी राष्ट्रपती डाँ.अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवस १५ आँक्टोबर या वर्षापासुन वृत्तपत्र विक्रेता दिन म्हणुन साजरा केला जात आहे या निमित्याने सभेत शहर व तालुक्यातील सर्व वृत्तपत्र वितरक बंधुंना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या
तसेच श्रीराम जेष्ठ  नागरिक संघाच्या कार्यकारिणीची ३१ आँक्टोबर २०१८ ला मुदत संपत आहे त्यामुळे नवीन कार्यकारिणी ची निवड करण्याकरिता विचार विनिमय करण्यात आला
याप्रसंगी संघटक बी.के.बाफणा,चिटणीस कृष्णा शिंदे
विशेष आमत्रिंत मा.आ.मारोतीराव पवार,उपचिटणीस
नारायण बोरसे,उपाध्यक्ष बबन सुरशे,खजिनदार नंदलाल भाबारे सदस्य नानासाहेब लोढे,सुदाम
खरात,एस.व्ही.निकुभ,बबनराव रसाळ,एम.बी
जाधव उपस्थित होते

थोडे नवीन जरा जुने