संविधान वाचवण्यासाठी भाजपाला २०१९ ला तडीपार करा : संसारे
संविधान वाचवण्यासाठी भाजपाला २०१९ ला तडीपार करा : संसारे

येवला : प्रतिनिधी

देशात वेगवेगळ्या समाजात आज तेढ निर्माण केले जात आहे. देशातील महिला सुरक्षित नाही. आरक्षणाच्या नावाखाली दोन समाजात तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य केले जात आहे. दिल्ली येथे जंतरमंतरवर भारतीय संविधान जाळण्यात आले. सिमेवरील जवान मोठ्या प्रमाणात शहीद होत आहे. गरिबांच्या खात्यावर रक्कम अदा करुन अशा वेगवेगळ्या स्वरुपाचे खोटी आश्‍वासने देऊन केंद्रीय मंत्री अनंत हेडगेवार याने म्हटल्याप्रमाणे आम्ही संविधानबदल करण्यासाठी निवडून आलो आहेत. असे जाहीर वक्तव्ये करुन प्रत्यक्षात संविधान देखील जाळण्यात आले. देशातील लोकशाहीचा अपमान नव्हे काय? त्यासाठी येणार्‍या २०१९ मध्ये या जातीवादी भाजपाला तडीपार करा, असे आवाहन स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे प्रणेते मनोज संसारे यांनी केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक धर्मांतर घोषणेच्या वर्धापन दिनी सायंकाळी स्वारिपची अभिवादन सभा शहरातील शनि पटांगणावर आयोजित करण्यात आली होती. यावेळी अध्यक्षीय भाषणात संसारे बोलत होते. प्रारंभी डॉ. आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पुजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आले. प्रास्ताविक स्वारिपचे तालुकाध्यक्ष महेंद्र पगारे यांनी केले. नानासाहेब इंदिसे, साहित्यीक अर्जुन डांगळे, तानसेनभाई नन्नावरे आदी नेत्यांनी यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी प्रसिद्ध पार्श्‍वगायक आनंद शिंदे, दत्ता शिंदे, नंदा नांद्रेकर, शालिनी शिंदे, वैशाली शिंदे, विधाता आहिरे, राजरत्न राजगुरु यांचा क्रांतीकारी भिमगीतांचा कार्यक्रम झाला. सुत्रसंचालन अजिजभाई शेख यांनी केले. याप्रसंगी संविधान परिवाराचे अशोक वाघमारे, निशिकांत दासुद, बाळाराम जाधव, वसंतराव म्हस्के, अरुण धिवर, अनिल सोनवणे आदींसह हजारो नागरिक उपस्थित होते. आभार विजय घोडेराव यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी तालुकाध्यक्ष पगारे, विजय घोडेराव, अजहर शेख, राजाभाऊ बनसोडे, शशिकांत जगताप, हमजा मन्सुरी, नवनाथ पगारे, बाळासाहेब आहिरे, बाळासाहेब सोनवणे, आकाश घोडेराव, विनोद त्रिभुवन, विक्रम पवार, बाळु चंदन, तुळशीराम जगताप, विकास दुनबळे, ऍड. अनिल झाल्टे, सागर गरुड, आशा आहेर, रंजना पठारे, रेखा पगारे, कांताबाई गरुड, संगिता आहिरे, ज्योती पगारे, वाल्हुबाई जगताप, अलका घोडेराव, शोभा घोडेराव यांनी परिश्रम घेतले.

अन् संसारेंचे भाषण थांबले...
पक्षाचे संस्थापक मनोज संसारे यांचे अध्यक्षीय भाषण सुरु असतांना समोरुन एक अंत्ययात्रा येताच भाषण काही काळ थांबले. हजारो नागरिकांनी अत्यंयात्रेस रस्ता मोकळा करुन दिला व दोन मिनीटे उभे राहून श्रद्धांजली वाहिली.


थोडे नवीन जरा जुने