आग्रा सुटका मोहीम रॅलीचे होणार स्वागत
आग्रा सुटका मोहीम रॅलीचे होणार स्वागत
येवला :  प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्रा सुटका मोहिमेच्या निमित्ताने मोटारसायकल रॅली आग्रा येथे जाणार आहे. ही रॅली ११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी येवल्यात येणार आहे. त्या निमित्ताने शहरातील टिळक मैदानात या रॅलीत सहभागी होणार्‍या युवकांच्या स्वागताचे व जाहीर सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. या नियोजना बाबत ऍड. माणिकराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली रायगड या त्यांच्या निवासस्थानी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. रक्ताचा एकही थेंब न सांडता, एकही स्वराज्यनिष्ठ मावळा खर्ची न घालता, नवसृजित स्वराज्याच्या खजिन्यातून एकाही पैचे नुकसान न होवू देता आपले उत्तर हिंदुस्थान टेहळणी अभियान सिद्ध करताना दिल्लीपतीची संपूर्ण जगात छी-थू करवून राजकारणाच्या पटलावरील सारीच प्यादी अचाट बुद्धी कौशल्याने हलवताना श्री शिवछत्रपतींनी साधलेला राजकीय उत्तर दिग्विजय याची देही, याची डोळा अनुभवायचा आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व जाती-धर्माच्या युवकांनी या सोहळ्यास उपस्थित रहावे, असे आवाहन ऍड. शिंदे यांनी यावेळी केले. या वेळी ऍड. शाहू शिंदे, संजय सोमासे, भागूनाथ उशीर, नितीन जाधव, प्रकाश गुडघे, सागर नाईकवाडे, काकासाहेब वाणी, राजेंद्र गायकवाड, अरविंद शिंदे, पुरुषोत्तम रहाणे, गोरख आहेर, सुनील गायकवाड, नाना लहरे व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने